Next
पुणे येथे ‘दृष्टिकोन २०१८’चे आयोजन
प्रेस रिलीज
Wednesday, April 04, 2018 | 02:17 PM
15 0 0
Share this storyपुणे : फोटोग्राफर्स अॅट पुणे’ (पीअॅटपी) या छायाचित्रकारांच्या ग्रुपतर्फे ‘दृष्टिकोन २०१८’ या नवव्या वार्षिक छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सहा ते आठ एप्रिल २०१८ या कालावधीत येथील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे सकाळी १० ते रात्री आठ या वेळेत भरणार आहे.

नाट्य कलाकार आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांच्या हस्ते सहा एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या प्रदर्शनात ७० छायाचित्रकारांनी काढलेल्या ९८ छायाचित्रांचा समावेश असून, सुमारे पाच हजार छायाचित्रांमधून या ९८ छायाचित्रांची निवड करण्यात आली आहे. या प्रदर्शनाद्वारे पोट्रेट्स, मॅक्रो, वाईल्ड लाईफ, अॅबस्ट्रॅक्ट, स्ट्रीट फोटोग्राफी, लॅंडस्केप आदी वैविध्यपूर्ण छायाचित्रे कलाप्रेमींना पाहता येणार आहेत. हे प्रदर्शन विनामूल्य आहे.

सहा सदस्यांनी एकत्र येऊन २००६ साली ‘पीअॅटपी’ या छायाचित्रकारांच्या अनौपचारिक ग्रुपची स्थापना केली. देशातील छायाचित्रकारांच्या ग्रुपपैकी ‘पीअॅटपी’ हा एक नावाजलेला ग्रुप आहे. विद्यार्थ्यांपासून, डॉक्टर, व्यावसायिक असे विविध क्षेत्रातील सुमारे सहा हजार ५०० हौशी छायाचित्रकार ‘पीअॅटपी’ चे सभासद आहेत. यामध्ये १५ वर्षांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंतच्या वयोगटातील छायाचित्रकारांचा समावेश आहे.

‘पीअॅटपी’ ग्रुपचे सभासद होण्यासाठी इच्छुक व्यक्तीला छायाचित्र कलेचा छंद असण्याबरोबरच तो कोणत्यातरी कारणाने पुणे शहराशी संबंधित असणे आवश्यक आहे. हा ग्रुप केवळ ऑनलाईन नाही, तर त्यातील सभासदांतर्फे वेळोवेळी छायाचित्रांशी संबंधित विविध कार्यक्रम घेण्यात येतात. ते छायाचित्रे टिपण्यासाठी एकत्र येण्याबरोबरच छायाचित्र कलेसंबंधी कार्यशाळा, फोटो वॉक, चर्चासत्रांचे आयोजनही करतात.

‘पीअॅटपी’ ग्रुपने विद्या महामंडळ या विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेशी सहकार्य करार केला असून, प्रदर्शनातून विक्री होणाऱ्या छायाचित्रांच्या उत्पन्नापैकी ५० टक्के रक्कम सामाजिक कामासाठी या संस्थेला देण्यात येते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून यंदाही ती या संस्थेला  देण्यात येणार आहे.

 ‘फोटोग्राफर्स अॅट पुणे’विषयी :
‘फ्लिकर’ हे ऑनलाईन पोर्टल ‘पीअॅटपी’ या संकल्पनेचा मूळ आधार आहे. हा समूह फेसबुक पेजवर देखील कार्यरत असून, छायाचित्र कला जोपासण्यासाठी त्याचा एक व्यासपीठ म्हणून वापर करण्यात येत आहे. त्यावर दर आठवड्याला सरासरी ३० सभासद जोडले जातात, तर सुमारे एक हजार छायाचित्रे पोस्ट होतात. आजपर्यंत शेअर केलेली सुमारे एक लाख ५४ हजार छायाचित्रे देखील त्यावर आहेत.  

प्रदर्शनाविषयी :
दिवस :
सहा ते आठ एप्रिल २०१८
वेळ : सकाळी दहा ते रात्री आठ  
स्थळ : राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी, पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रस्ता, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link