Next
‘शककर्ते शिवराय’ची चौथी आवृत्ती सादर
प्रकाशनपूर्व सवलत योजना एक मार्च २०१९ पर्यंत सुरू
प्रेस रिलीज
Thursday, January 10, 2019 | 12:14 PM
15 0 0
Share this article:

पुणे : सुप्रसिद्ध शिवकथाकार विजयराव देशमुख (सद्गुरूदास महाराज) लिखित ‘शककर्ते शिवराय’ या द्विखंडात्मक दुर्मिळ व प्रासादिक शिवचरित्राची चौथी आवृत्ती नव्या स्वरूपात सादर करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने नागपूर येथील छत्रपती सेवा प्रतिष्ठान प्रकाशित करीत असलेल्या ‘शककर्ते शिवराय’ची प्रकाशनपूर्व सवलत योजना जाहीर झाली असून, १८०० रूपये किंमतीचे हे पुस्तक (दोन्ही खंड मिळून) पूर्वनोंदणी करणार्‍यांना १२०० रुपयांत उपलब्ध होणार आहे. सवलत योजना एक मार्च २०१९ पर्यंत सुरू राहील.

सवलत योजना नोंदणी महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे सुरू आहे. या नव्या स्वरूपातील पुस्तकात एकूण दोन खंडांसह एक हजार १९० पृष्ठसंख्या असून, यात उत्तम बांधणी, उत्कृष्ट कागद, उत्तम छपाई याशिवाय अनेक रंगीत, दुर्मिळ छायाचित्रे, नकाशे यांचा समावेश करण्यात आला आहे. नव्या स्वरूपातील पुस्तकाचे २३ मार्च २०१९ रोजी होणार प्रकाशन होणार आहे.

‘शककर्ते शिवराया’च्या पहिल्या तीन आवृत्त्या संपल्या असून, फक्त महाराष्ट्र व भारतातच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांत विक्री झाली आहे. खास लोकाग्रहास्तव चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन केले जाणार आहे. या ग्रंथाची प्रकाशनपूर्व नोंदणी संपूर्ण राज्यात प्रारंभ झाली आहे. शिवपुत्र संभाजी महानाट्यातील संभाजी यांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकतेच विजयराव देशमुख यांची भेट घेऊन यासाठी पूर्वनोंदणी केली आहे. छत्रपती शिवाजीराजांची भूमिका करताना मला शककर्ते शिवराय या ग्रंथाचे वाचन खूप सहाय्यक ठरले, असे डॉ. कोल्हे यांनी या वेळी सांगितले.

अधिक माहितीसाठी संपर्क :
अजेय देशमुख- ८३९०९ ०३९८३  

(‘शककर्ते शिवराय खंड १ व २’ ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search