Next
‘दिव्यांग नोंदणीची प्रक्रिया सुलभ करणार’
प्रेस रिलीज
Tuesday, January 30 | 03:42 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘दिव्यांग व्यक्तींच्या नोंदणीसाठी आवश्यक असणारी प्रक्रिया अधिकाधिक सुटसुटीत तसेच सुलभ करण्यासाठी प्रयत्न करणार आहे,’ असे प्रतिपादन खासदार अनिल शिरोळे यांनी केले.

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या सहयोगाने पुणे शहरातील दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे मोफत वाटप पूर्व मूल्यांकन व नाव नोंदणी शिबिराचा समारोप दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते.

या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, आमदार मेधा कुलकर्णी माधुरी मिसाळ, नगरसेवक दीपक पोटे , जयंत भावे, स्वाती लोखंडे, मंजुश्री खर्डेकर, दिनानाथ रुग्णालयाचे डॉक्टर माधव भट तसेच जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राचे विजय कान्हेकर, महानगर पालिकेच्या समाज कल्याण विभागाचे संजय राजणे आदी उपस्थित होते.

‘कानपूर येथील अलीम्को कंपनीबरोबरच पुणे महापालिका, जिल्हा प्रशासन, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र तसेच जिल्हा समाज कल्याण विभाग यांच्या सहयोगाने आयोजित या शिबिरात पुणे शहर व परिसरातील एकूण एक हजार ८४१ जणांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला; तसेच त्यांच्या तपासणीनंतर मूल्यांकन करून एकूण एक हजार १५२ लाभार्थी दिव्यांगांना आगामी कालावधीमध्ये आवश्यक ते कृत्रिम अवयव जसे की फूट, व्हील चेअर, तीन चाकी सायकल, श्रवण यंत्र, अंध व्यक्तींसाठी स्मार्ट मोबाईल फोन आदी वस्तूंचे वाटप होणार आहे’, असे शिरोळे यांनी या वेळी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link