Next
दुर्मीळ दुचाकी पाहण्याची पुणेकरांना सुवर्णसंधी
BOI
Friday, September 28, 2018 | 05:50 PM
15 0 0
Share this story

पुणे : तब्बल ७५ वर्षे जुनी ‘मॅचलेस’ नावाची ब्रिटिश मोटरसायकल,१९५०मधील रॉयल एन्फिल्डची स्कूटर अशा विविध प्रकारच्या दुर्मीळ दुचाकी पाहण्याची संधी पुणेकरांना येत्या शनिवारी मिळणार आहे. स्वयंचलित वाहननिर्मिती क्षेत्राच्या ऐतिहासिक साक्षीदार असलेल्या तब्बल ४५० दुचाकींचा संग्रह विनीत केंजळे यांनी केला आहे. शनिवारी, २९ सप्टेंबर २०१८ रोजी बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील ‘लाइटहाउस मॉल’ येथे या सर्व दुचाकींचे प्रदर्शन सुरू होत आहे. सात ऑक्टोबरपर्यंत सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.

देशातील जवळपास सर्व स्कूटर्सचा संग्रह केंजळे यांच्याकडे असून, पन्नास वर्षांहून अधिक काळ ते मोटरसायकली, मोपेड्स, स्कूटर्स यांचा संग्रह करत आहेत. ‘लिम्का बुक’मध्ये त्यांच्या या संग्रहाची नोंद झाली आहे. 

विनीत केंजळे
आता या दुचाकींचे महाबळेश्वर येथे संग्रहालय उभारण्यात येणार असल्याने, या सर्व दुचाकी तिकडे नेण्यात येणार आहेत. तत्पूर्वी पुणेकरांना हा मौल्यवान ठेवा पाहता यावा, यासाठी त्यांनी हे प्रदर्शन आयोजित केले आहे. 

दुर्मीळ दुचाकींचे प्रदर्शन 
स्थळ : लाइटहाउस मॉल, बिबवेवाडी-कोंढवा रोड, पुणे.
वेळ : २९ सप्टेंबर ते सात ऑक्टोबर २०१८ - सकाळी १० ते रात्री ९.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Vinita Pathak About 142 Days ago
Nice
1
0

Select Language
Share Link