Next
‘मुक्तसंध्या’मध्ये उलगडला अशोक पत्कींचा सुरेल प्रवास
प्रेस रिलीज
Tuesday, November 07, 2017 | 01:46 PM
15 0 0
Share this article:

पुणे : एकाहून एक सरस मालिकांची शीर्षकगीते, मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारी भावगीते यांपासून सुरू झालेल्या स्वर-शब्द मैफलीदरम्यान ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या सांगीतिक कारकिर्दीचा प्रवास रसिकांसमोर उलगडला. निमित्त होते ते येथील चतुरंग प्रतिष्ठान आयोजित ‘मुक्तसंध्या’ कार्यक्रमाचे.
 
गायक विनायक जोशी यांनी पत्कींशी संवाद साधला. एस. डी. बर्मन, आर. डी. बर्मन, सी. रामचंद्रन यांच्यापासून ते आताच्या पिढीचे देवकी पंडित, अजय-अतुल, स्वप्नील बांदोडकरपर्यंतच्या गायकांबरोबर काम करतानाचा अनुभव पत्कींनी रसिकांसमोर मांडला. त्यांच्या काही गाण्यांना मिहीर पराडकर यांनी तबला साथ केली.

अनेकविध गाण्यांना, मालिकांच्या शीर्षकगीतांना चाली देतानाच्या आठवणींची कवाडे उघडी करताना आजच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे नवोदित गायकांचे नुकसान होत असल्याची खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली. सुमारे दोन तास चाललेल्या शब्द-सूर मैफलीला पुणेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

शेवटी ‘चतुरंग’चे संस्थापक कार्यकर्ते विद्याधर निमकर यांनी ‘चतुरंग’तर्फे यावर्षी पुण्यात आयोजित रंगसंमेलनात संपन्न होणाऱ्या नवरंगी कार्यक्रमाची माहिती देऊन आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search