Next
‘आमीर’ दिसणार ‘ओशों’च्या भूमिकेत
आध्यात्मिक गुरू ओशो यांच्या बायोपिकमध्ये ‘आलिया’ही..
BOI
Saturday, September 01 | 04:47 PM
15 0 0
Share this story


बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेंड सुरू आहे. दंगल, हसीना पारकर, सचिनः अ बिलियन ड्रीम्स, गोल्ड, संजू यांसारखे बायोपिक चित्रपट गेल्या काही काळात प्रदर्शित झाले असतानाच या बायोपिकच्या ट्रेंडमध्ये आता आणखी एका बायोपिकची भर पडणार आहे. आध्यात्मिक गुरू ‘रजनिश ओशो’ यांच्यावरील बायोपिक सध्या चर्चेत आहे. विशेष बाब म्हणजे मि. परफेक्शनिस्ट म्हणजेच आमीर खान यात ओशोंच्या भूमिकेत दिसणार आहे. 

हटके विषयांवरील चित्रपट आणि त्यातील असामान्य भूमिका यासाठी अभिनेता आमीर खान ओळखला जातो. अभिनयाचा कस लागेल अशा भूमिका करणे त्याला नेहमीच आवडते. अशातच ओशोंची भूमिका करण्याची मोठी जबाबदारी आता आमीरने स्वीकारली आहे. आमीरसोबतच अभिनेत्री आलिया भटदेखील या चित्रपटाचा भाग असल्याचे सांगितले जात आहे. ओशो यांची सेक्रेटरी असलेल्या ‘मॉं आनंद शीला’ यांच्या भूमिकेसाठी तिच्या नावाला पसंती देण्यात आली आहे. 

दिग्दर्शक शकुन बत्रा यांनी ओशो यांच्यावरील बायोपिक करण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी तयारीही सुरू केली आहे. सध्या तरी आमीर आणि आलिया या दोघांचीच नावे चर्चेत असून इतर गोष्टी अजून ठरलेल्या नाहीत. खरे तर आमीर आणि आलिया या दोघांमुळेच या आगामी चित्रपटाभोवती एक वलय तयार झाले असून यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.  

साधारण १९६०च्या दशकात आध्यात्मिक गुरू ओशो यांनी त्यांच्या आध्यात्मिक विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी भारतभर भ्रमंती केली होती. ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. विशेष म्हणजे महात्मा गांधी यांच्या विचारांचा त्यांनी विरोध केला होता आणि त्यामुळे त्यांच्यावर भरपूर टीकाही झाली होती. त्यांच्या अशा सगळ्या पार्श्वभूमीमुळे त्यांचे हे कथानक पाहण्यास अर्थातच सगळेच उत्सुक आहेत. आमीर खान आणि आलिया यांच्या नावांवर खरेच शिक्कामोर्तब होऊन ते या भूमिकांमध्ये दिसले तर पडद्यावर ते दोघे पहिल्यांदाच एकत्र दिसतील. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link