Next
पिंपरी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
प्रेस रिलीज
Monday, July 09 | 04:45 PM
15 1 0
Share this story

पिंपरी : येथील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालय व संशोधन केंद्र यांच्यातर्फे नऊ ते १४ जुलै २०१८ या कालावधीत रोजी सकाळी नऊ ते ते दुपारी चार या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कान, नाक, घास, डोळे, तसेच पंचकर्म चिकित्सेमध्ये सर्व साध्यांचे आजार, आम्लपित्त, आमवात आदी आजारांसाठी हे शिबिर घेण्यात येत आहे.

या शिबिरात पंचकर्माची आवश्यकता आणि महत्त्व याबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार असून, डोळ्यांची तपासणी, कान, नाक, घसा या संदर्भातील आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात येईल. विविध आयुर्वेदिक उपचारांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी हा या शिबिराचा उद्देश आहे.

‘या शिबिरामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

शिबिराविषयी :
दिवस :
नऊ ते १४ जुलै २०१८
वेळ : सकाळी नऊ ते दुपारी चार
स्थळ : डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालय व संशोधन केंद्र, पुणे १८, संत तुकाराम नगर, पवन इंडस्ट्रीज जवळ, पिंपरी.
अधिक माहितीसाठी संपर्क : भारती मराठे- ८३२९१ ५२३९८
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link