Next
न्युरो फीडबॅक चिकित्सेवर मोफत निदान, मार्गदर्शन शिबिर
प्रेस रिलीज
Tuesday, April 30, 2019 | 03:26 PM
15 0 0
Share this article:

संग्रहित फोटोऔंध : ब्रेनमॅपिंग इंडिया फोरम क्लिनिकतर्फे न्युरो फीडबॅक चिकित्सेवर मोफत निदान व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर एक ते १० मे २०१९ या  दरम्यान ब्रेनमॅपिंग इंडिया फोरम क्लिनिकमध्ये दुपारी दोन ते सायंकाळी सात या वेळेत घेण्यात येईल. 

या शिबिरात अतिचंचलता (एडीएचडी), फिट येणे, फेफरे येणे (एपिलेप्सी), शीघ्र संतापी, मतिमंदता, अभ्यासात अडचणी येणार्‍या रुग्णांना मोफत मार्गदर्शन व निदान केले जाणार आहे. न्युरो फीडबॅक चिकित्सेच्या माध्यमातून ही तपासणी होणार आहे. यामध्ये ब्रेन फिजिओलॉजिस्ट व न्युरो फीडबॅक फिजिअशन डॉ. प्रशांत देशमुख मार्गदर्शन करणार आहेत. 

शिबिरात येणार्‍या रुग्णांना नावनोंदणी आवश्यक असून, रुग्णांना सवलतीच्या दरात औषधोपचार केले जाणार आहेत. विशेष म्हणजे रुग्णांना औषध उपचार करताना ‘QEEG’ ब्रेन मॅपिंग चाचणी आवश्यक आहे. 

न्युरो फीडबॅक चिकित्सा (टेस्ट) पूर्णतः विना वेदनादायी असून, औषधीमुळे दुष्परिणाम होत नाही. ब्रेन न्यूरो फिजिओलॉजी या तंत्रज्ञानाने ऑटिझम, निद्रानाश, चिंतारोग, डिप्रेशन, औषध किंवा मादक पदार्थांचे व्यसन, ट्रॉमा, ब्रेन इन्जुरी (मेंदूची दुखापत), धमण्यांची वेदना कमी करता येते. आत्तापर्यंत ब्रेनमॅपिंग इंडिया फोरम क्लिनिकमध्ये आलेल्या रुग्णांपैकी ५० टक्के रुग्णांना त्याचा फायदा झाला असून, सुमारे ३० टक्के रुग्णांना औषधांमुळे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

शिबिराविषयी : 
कालावधी : एक ते १० मे २०१९ 
वेळ : दुपारी दोन ते सायंकाळी सात 
स्थळ :  ब्रेनमॅपिंग इंडिया फोरम क्लिनिक, १०१ वेस्टअँड मॉलसमोर, स्टोलर एनक्लेव्ह, औंध.
नोंदणीसाठी संपर्क : ९८२३८ ३२४४४
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search