Next
‘टाटा मोटर्स’तर्फे ‘टेकफेस्ट आणि स्किलफेस्ट’चे चौथे पर्व
११ हजारांहून अधिक डीलर, तंत्रज्ञ व सेवा सल्लागारांचा सहभाग
प्रेस रिलीज
Wednesday, June 26, 2019 | 05:58 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘टाटा मोटर्स’तर्फे ‘टाटा मोटर्स ग्लोबल टेकफेस्ट आणि स्किलफेस्ट २०१९’ या उपक्रमाचे चौथे पर्व नुकतेच आयोजित करण्यात आले होते. व्यावसायिक वाहनांच्या जगभरातील तंत्रज्ञांचे आणि सेवा सल्लागारांचे कौशल्य व ज्ञान यात सुधारणा करण्याच्या उद्दिष्टाने हा उपक्रम राबवला जातो. या कार्यक्रमासाठी जगभरातील २९ देशांतील सातहजार ४०० तंत्रज्ञ व साडेतीन हजार सेवा सल्लागारांनी प्रवेशिका भरल्या होत्या. यात भारतातील ८०१ चॅनल पार्टनर्स आणि आसियान, लाताम, सार्क, एलएचडी आफ्रिका, आरएचडी आफ्रिका व आखाती देशांतील (मिड्ल इस्ट) ५०० चॅनल पार्टनर्सचा समावेश होता.  

आपल्या व्यावसायिक वाहनांच्या चॅनल पार्टनर्समधील तंत्रज्ञ व सेवा सल्लागार आणि टाटा मोटर्स यांच्यात परस्पर समजूत वाढीला लावण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवला जातो. सहभागी सदस्यांची तांत्रिक तसेच सल्लागार कौशल्ये साजरी करणे, त्यांना सेवेतील अत्याधुनिक तंत्रे शिकण्याची मुभा देणे, त्यांच्या प्रशिक्षणाच्या गरजा समजून घेणे आणि सेवा व डिलिव्हरीचा दर्जा सर्वोच्च राहील याची खातरजमा करणे हा या वर्षीच्या पर्वाचा विषय होता. 

यातील ‘स्किलफेस्ट’च्या प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे दोन हजार डॉलर्स, दीड हजार डॉलर्स आणि एक हजार डॉलर्स अशी रोख बक्षिसे देण्यात आली. ‘टेकफेस्ट’साठी प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे सतराशे डॉलर्स, बाराशे डॉलर्स आणि सातशे डॉलर्स अशी रोख बक्षिसे देण्यात आली. 

या विषयी बोलताना ‘टाटा मोटर्स’च्या सीव्हीबीयूच्या ग्राहक सेवा विभागाचे जागतिक स्तरावरील प्रमुख आर. रामकृष्णन म्हणाले, ‘कुशल मनुष्यबळाचा, विशेषत: तंत्रज्ञांचा तुटवडा हे वाहन उद्योगापुढील मोठे आव्हान आहे. उद्योगाचे स्वरूप बदलत असताना, त्यातील सेवांमध्येही सुसंगत उत्क्रांती होत राहणे अत्यावश्यक आहे. उद्योगक्षेत्रातील कौशल्याची कमतरता भरून काढणे व सहभागी सदस्यांना प्रत्यक्ष अध्ययानाची संधी देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. एक जबाबदार कंपनी म्हणून आम्ही या उद्योगातील कौशल्यविकास व रोजगार निर्मितीच्या कामाप्रती बांधील आहोत.’

यात सहभागी सदस्यांना व्यावसायिक वाहनांच्या विविध अंगांचा परिचय करून दिला जातो. यासाठी तांत्रिक पद्धतींचे स्पर्धात्मक परीक्षण, उत्पादनाबद्दलची निदाने, समस्या निवारण कौशल्ये, साधन उपकरणांच्या वापराची माहिती, कामाच्या सुरक्षित पद्धती, प्रक्रियांची माहिती, सीआरएमडीएमएस व ग्राहक सेवा अॅप यांसारख्या सेवा आयटी परिसंस्था यांची माहिती करून दिली जाते. ग्राहककेंद्री दृष्टिकोन, सॉफ्ट स्किल्स तसेच तंत्रज्ञानातील नवीन घडामोडी यांची माहिती दिली जाते. 

ही पाच टप्प्यांची स्पर्धा विविध तांत्रिक व सैद्धांतिक (थिओरेटिकल) चाचण्यांवर आधारित आहे. याद्वारे तंत्रज्ञांच्या दर्जाचे विश्लेषण केले जाते. या मूल्यांकन प्रक्रियांच्या माध्यमातून टाटा मोटर्सला प्रगत प्रशिक्षण प्रारूपे विकसित करणे शक्य होते. या प्रारूपांच्या माध्यमातून विशेष साधनांसाठी तांत्रिक कौशल्ये अद्ययावत करणे तसेच त्यांच्या वापरात सुधारणा आणणे शक्य होते. त्याचप्रमाणे सर्वोत्तम प्रतिभा ओळखून त्यायोगे चॅनल पार्टनर्समध्ये निकोप स्पर्धेचे वातावरण निर्माण करता येते. या उपक्रमाची चार पर्व झाली असून, त्यातून कंपनीच्या व्यावसायिक वाहन चॅनल पार्टनर्समधील वीस हजारांहून अधिक तंत्रज्ञ व सेवा सल्लागारांना प्रशिक्षण, तसेच प्रत्यक्ष अनुभव प्राप्त झाला आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search