Next
डॉ. पतंगराव कदम यांना श्रद्धांजली
प्रेस रिलीज
Monday, March 12, 2018 | 03:16 PM
15 0 0
Share this article:

दिवंगत डॉ. पतंगराव कदमपुणे : ‘डॉ. पतंगराव कदम यांच्या ध्यास पाहून आम्ही संस्थेत कार्यरत झालो. त्यांना पाहून जागेवरून आदरयुक्त उठायची सवय होती. आज मात्र श्रद्धांजलीसाठी उठून उभे राहण्याची वेळ आली, हे कल्पनेपालिकडचे दुर्दैव आहे,’ अशा शब्दांत ‘भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रेन्युरशिप डेव्हलपमेंट’चे संचालक आणि विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर यांनी डॉ. पतंगराव कदम यांना श्रद्धांजली अर्पण केली.

आयएमईडीमध्ये १२ मार्च २०१८ रोजी डॉ. पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्राध्यापक, विद्यार्थ्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी डॉ. वेर्णेकर बोलत होते.

‘डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्चशिक्षण घेऊन जगभर गेले. हे मोठे शैक्षणिक कार्य आहे. भारती विद्यापीठात सर्वधर्मीय अध्यापक काम करतात आणि सर्व प्रांतातील विद्यार्थी शिक्षण घेतात. हा व्यापक दृष्टीकोण डॉ. पतंगराव कदम यांच्यामुळे तयार झाला. भारती विद्यापीठाचा दिल्ली कॅम्पस सांभाळण्याची कामगिरी अकरा वर्षे माझ्यावर सोपविण्यात आली. या सर्व काळात डॉ. पतंगराव कदम यांची नेतृत्वशैली आणि व्यक्तिमत्त्व अभ्यासता आले,’ असेही डॉ. वेर्णेकर म्हणाले.

आयएमईडी, पौड रस्ता येथे झालेल्या श्रद्धांजली सभेवेळी एमबीए, एमसीएचे प्राध्यापक, विद्यार्थी व सेवक वर्ग उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search