Next
रत्नागिरीच्या खेळाडूंनी केली पदकांची लयलूट
BOI
Monday, September 10, 2018 | 03:36 PM
15 0 0
Share this story

राज्य युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत रत्नागिरीतील यशस्वी प्रणव मुळ्ये, वरद पेठे, आयुष मयेकर व यश गोगटे यांच्यासमवेत मान्यवर.

रत्नागिरी : नाशिक येथे झालेल्या राज्य युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत रत्नागिरीच्या खेळाडूंनी बक्षिसांची लयलूट केली. महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातून निवड झालेल्या चारही बुद्धिबळपटूंनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली.

प्रणव मुळ्ये याने स्पर्धेतील सर्वोत्तम अनरेटेड बुद्धिबळपटूचा मान पटकावला. प्रथमतच क्लासीकल फिडे मानांकन स्पर्धा खेळणार्‍या प्रणवने पहिल्याच स्पर्धेत १२७८ आंतरराष्ट्रीय फिडे रेटिंग प्राप्त केले. १४ वर्षांच्या यश गोगटे याने स्वतःपेक्षा अधिक मानांकन असलेल्या खेळाडूंवर मात करीत हजार ते तेराशे मानांकन गटात पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. यशने स्वतःच्या फिडे मानांकनात ७० गुणांनी वाढ केली. वरद पेठे याने १७ वर्षे वयोगटात पाचवा क्रमांक पटकावला. १४ वर्षांच्या आयुष मयेकर याने हजार ते तेराशे गटात आठवा क्रमांक प्राप्त करीत फिडे गुणांकनात वाढ केली.

हे सर्व खेळाडू रत्नागिरीतील प्रशिक्षक चैतन्य भिडे यांच्या मॅजिक स्क्वेअर चेस अॅकॅडमीमध्ये बुद्धिबळाचा सराव करतात. या चमकदार कामगिरीनिमित्त सर्व यशस्वी खेळाडूंचे रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेमार्फत कौतुक करण्यात आले. या प्रसंगी मंगेश मोडक, राष्ट्रीय पंच विवेक सोहनी, सुहास कामतेकर, विनायक पेठे, गिरीश मुळ्ये आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link