Next
‘साहित्य देते अनेक आयुष्ये जगण्याचा आनंद’
BOI
Friday, September 28, 2018 | 03:49 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘जसे भूक भागवण्यासाठी अन्नपदार्थ लागतात, तसेच मन आणि बुद्धी समृद्ध करण्यासाठी ग्रंथांची गरज असते. कोणत्याही क्षेत्रात शिकत असाल, तरी साहित्याशी असलेली नाळ तोडू नका. एका जीवनात अनेक आयुष्ये जगण्याचा अनुभव केवळ साहित्यामुळेच मिळू शकतो,’ असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) आयोजित केलेल्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. हे प्रदर्शन २९ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळपर्यंत खुले आहे.

प्रा. मिलिंद जोशीप्रा. जोशी म्हणाले, ‘हल्लीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवनशैलीत ग्रंथवाचनाला स्थान नाही. त्यांचे आयुष्य इतरांसाठीची अभिप्राय वही बनले आहे. इतरांच्या लाइक्स आणि कमेंट्सवर त्यांचे जीवन चालले आहे. त्यामुळे स्वतःचे असे काही राहत नाही. व्यक्तिमत्त्वासाठी ते योग्य नाही. आज समाज नैराश्याच्या वातावरणातून जात आहे. या नैराश्यातून तरुण पिढीला बाहेर काढायचे असेल, तर वाचन आवश्यक आहे.’

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, उपप्राचार्य व ग्रंथालय प्रमुख डॉ. सुरेश वाघमारे, व्ही. व्ही. घाणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

(कार्यक्रमाची झलक दाखवणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search