Next
‘सिंहगड इन्स्टिट्यूट’मध्ये मतदार जागृती दिन साजरा
प्रेस रिलीज
Wednesday, January 30, 2019 | 01:55 PM
15 0 0
Share this story



लोणावळा : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या लोणावळा कॅंपसमध्ये सात महाविद्यालयांच्या वतीने मतदार जागृती दिन साजरा करण्यात आला.

या प्रसंगी वडगाव मावळ व मुळशीचे प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे, लोणावळ्याचे मंडल अधिकारी बी के मेकाले, गाव कामगार तलाठी एस. के. दगडे व त्यांचे कार्यालयीन सहकारी यांच्यासह कुसगाव बुद्रुक व सिंहगड लोणावळा संकुलातील सर्व प्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) कार्यक्रम अधिकारी व ‘एनएसएस’चे स्वयंसेवक उपस्थितीत होते.



प्रारंभी ‘एनएसएस’च्या विद्यार्थ्यांनी गणेश मंदिरापासून मतदान जागृतीविषयक फलक हाती घेऊन मतदान जागृती फेरी काढली. या फेरीचा मार्ग सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सिबाका, एन. बी. नवले कॉमर्स कॉलेज मार्गे श्रीमती काशीबाई नवले सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सच्या सभागृह असा होता.



संकुल संचालक प्राचार्य डॉ. माणिक गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. मतदान विषयक कार्य केलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा स्वयंसेवकांचा प्रांत अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. सजग मतदानासाठीची शपथ या वेळी सर्वांनी घेतली. भागडे यांनी मतदानाचे महत्त्व मोजक्या शब्दात मांडताना विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे नमूद केले. या वेळी व्हीव्हीपॅट मशीनची प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. पंकज जाधव यांनी आभार मानले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link