Next
ई-कॉमर्स बाजारपेठांसाठी ‘टाटा मोटर्स’ची नवीन श्रेणी सादर
प्रेस रिलीज
Monday, January 21, 2019 | 04:03 PM
15 0 0
Share this article:गुडगाव (नवी दिल्ली) : ई-कॉमर्स उद्योगाच्या महत्त्वपूर्ण, अनेक मागण्या करणाऱ्या व सतत वाढणाऱ्या गरजांची पूर्तता करण्यासाठी टाटा मोटर्सने आपल्या पहिलावहिल्या एंड-टू-एंड अनुभवात्मक एक्स्पोमध्ये १३ पूर्णपणे विकसित, वापरासाठी तयार अशा वाहनांची संपूर्ण श्रेणी प्रदर्शनासाठी ठेवली. हब-टू-हब-टू-स्पोक वाहतूक आणि एंड-टू-एंड डिलिव्हरीची प्रत्येक मागणी पूर्ण करणारी व्यवस्था या वाहनांमध्ये आहेत. गुडगाव येथील देवीलाल स्टेडिअममध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘ई-कॉमर्स एक्स्पो २०१९’मध्ये कंपनीने एससीव्ही, आयएलसीव्ही आणि एमएचसीव्ही विभागांतील आपले काही सर्वोत्तम विक्री असलेले वाहनप्रकारही प्रदर्शनासाठी ठेवले होते.

टाटा मोटर्सने ई-कॉमर्स उद्योगाच्या नेमक्या गरजा जाणून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात संशोधन करून ही पूर्णपणे विकसित, वापरण्यासाठी सज्ज वाहने तयार केली आहे. यासाठी कंपनीने आघाडीच्या ई-कॉमर्स कंपन्या व त्यांच्या विक्रेत्यांसोबत आपल्या स्वत:च्या इंजिनीअर्स व एफबीव्ही टीमचा संवाद घडवून आणत त्यांच्या सर्व गरजा लक्षात घेऊन वाहनांची रचना केली; तसेच त्यांना हव्या त्या सर्व सुविधा यात विकसित केल्या.

शेवटच्या मैलापर्यंत वितरण शक्य व्हावे म्हणून टाटा मोटर्सने आपल्या सर्वोत्तम विक्रीच्या एस प्लॅटफॉर्मवरील श्रेणीत वैविध्य आणत ई-कॉमर्स मालवाहतुकीसाठी एस डिलिव्हरी व्हॅन तयार केली आहे. त्याचप्रमाणे ई-कॉमर्स पॅकेजसाठी एस झिप पॅनल व्हॅन व पुष्‍कळ मालाच्या वाहतुकीसाठी सुपर एस मिंट एक्सपीएस तयार केले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, वापरासाठी सोपी व सोयीस्कर, सर्वोत्तम मायलेजसह कार्यक्षमता व खात्रीशीर कामगिरी ही या वाहनांची वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय ही वाहने श्रेष्ठ रचना, उत्तम इंधन किफायतशीरता, दीर्घकाळ सेवा देण्याची क्षमता (सर्व्हिस लाइफ) आणि अनेकविध उपयोजनांसाठी अनेक कस्टमायझेशन्सना सहाय्य करणारी वैविध्यपूर्णता यांच्यासाठी ओळखली जातात. म्हणूनच ही वाहने ई-कॉमर्स उद्योगासाठी अधिक चांगल्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.या वाहनांमध्ये कस्टमाइझ्ड पेलोड्स आणि डेस्क लेंग्थचे पर्याय आहेत. त्यामुळे व्हाइट गुड्ससारख्या कमी वजनाच्या मालापासून फळे, भाज्या व वाहनांचे भाग यांसारख्या वजनदार मालाची वाहतूक सोपी होते. टाटा सुपर एस मिंट इन्‍सुलेटेड कंटेनर दूध, दुधाचे पदार्थ, फळे व भाज्या, मांस आदी नाशवंत मालाच्या वाहतुकीसाठी तापमानाचे नियंत्रण करतो.

हब-टू-स्पोक वाहतुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीने हलक्या वजनाची व मध्यम वजनाच्या व्यावसायिक वाहनांची श्रेणी प्रदर्शनासाठी ठेवली होती. यात अल्ट्रा ट्रक्सची नव्याने सादर केलेली आधुनिक मालिका होती. या श्रेणीने थोड्या काळात भरीव वाढ साध्य केली आहे. ट्रक्सच्या अल्ट्रा रेंजला शक्तीशाली, आधुनिक व उच्च कामगिरी करणाऱ्या टर्बोट्रॉन इंजिनची शक्ती आहे. यामुळे कामगिरी, खात्रीशिरता, किफायतशिरपणा या सर्वच आघाड्यांवर हे ट्रक्स सरस ठरले आहेत. ओटीपी लॉक, सीसीटीव्ही कॅमेरा, लोड सेन्सर्स, टेलिमॅटिक्स प्रणाली आदी प्रगत सुविधा यात ई-कॉमर्स उद्योगांच्या मागणीनुसार देण्यात आल्या आहेत. नवीन प्रगत सुरक्षितता सुविधांनी ही वाहने सज्ज असून, ही बाळगण्याचा एकूण खर्च (ओनरशिप कॉस्ट) कमी आहे. ड्रायव्हिंगमधील सुलभता व सुरक्षिततेसह ही वाहने सर्वोत्तम मायलेज देणारी आहेत.  

या वेळी टाटा मोटर्सचे अध्यक्ष-सीव्हीबीयू गिरीश वाघ म्हणाले, ‘वाढती उत्पन्ने, सरकारचा वाढता पाठिंबा आणि इंटरनेटच्या वापरात झालेली वाढ यांमुळे भारतातील ई-कॉमर्स बाजारपेठ २०२६ सालापर्यंत २०० बिलियन डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. २०१७मध्ये ही बाजारपेठ ३८.५ बिलियन डॉलर्सच्या घरात होती. आज कंपन्याही त्यांची वितरण केंद्रे व वाहनांचा ताफा वाढवून ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करत आहेत. ‘ई-कॉमर्स एक्स्पो २०१९’ वाहतूकदार व ई-कॉमर्स कंपन्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्याचे एक व्यासपीठ म्हणून काम करेल असे आम्हाला वाटते. त्याचप्रमाणे हा एक्स्पो त्यांना कस्टमाइझ्ड सुविधांसह पूर्णपणे विकसित केलेली वैविध्यपूर्ण उत्पादनेही पुरवेल. आमच्या उत्पादनांच्या माध्यमातून आम्ही आमचे लक्ष आधुनिक उत्पादने व स्मार्ट सोल्युशन्सवर वळवत आहोत.’

‘ग्राहकांना साह्य करण्यासाठी टाटा मोटर्सने संपूर्ण सेवा छत्राखाली कस्टमाइझ्ड सोल्युशन्स विकसित केली आहेत. यामुळे ई-कॉमर्स कंपन्यांना त्यांच्या शेवटच्या ग्राहकाप्रती असलेला वायदा पूर्ण करण्यासाठी सक्षम वाहने व पर्यायाने पूर्ण मन:शांती मिळेल. संपूर्ण सेवांखाली विविध मूल्यवर्धित सेवा दिल्या जातात. यांमध्ये सर्वांत मोठे सेवा व सुटे भाग नेटवर्क, वाहनांच्या ताफ्याची देखभाल, विमा संरक्षण, लॉयल्टी कार्यक्रम यांचा समावेश होतो. या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून ग्राहकाला पूर्ण आराम मिळेल आणि टाटा मोटर्स त्यांच्या पसंतीचा पर्याय राहील, याची काळजी घेतली जाते,’ असे वाघ यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search