Next
‘मिंत्रा’च्या फॅशन सेलला २२ जूनपासून सुरुवात
प्रेस रिलीज
Tuesday, June 19, 2018 | 02:47 PM
15 0 0
Share this story

मुंबई : मिंत्राज् अँड ऑफ रिझन सेल (ईओआरएस) हा देशातला सर्वांत लोकप्रिय फॅशन सेल २२ ते २५ जून या कालावधीत रंगणार असून, या सेलच्या यंदाच्या आठव्या सत्रात दोन हजार ५०० हून अधिक ब्रॅंड्सच्या सहा लाखांहून अधिक स्टाइल्स सादर करण्यात येणार आहेत. या सेलदरम्यान, ग्राहकांना ५० ते ८० टक्के सूट देण्यात येणार आहे. जॅबाँग हा ब्रॅंडही ‘ईओआरएस’मध्ये सहभागी होणार असून, सामान्य दिवसांपेक्षा सहापट अधिक विक्री होण्याची या सेलकडून अपेक्षा आहे.

या सेलमध्ये नाइके, आदिदास, प्युमा, फॉरएव्हर २१, स्वरोव्हस्की, टॉमी हिलफिगर, जॅक अ‍ॅंड जोन्स, फ्लाइंग मशीन, मार्क्स अ‍ॅंड स्पेन्सर आणि मँगो हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रॅंड्स या सेलमध्ये सहभागी होणार असून, रोडस्टर, एचआरएक्स, ऑल अबाउट यू, मास्ट आणि हार्बर हे ‘मिंत्रा’चे खासगी ब्रॅंड्सही विशेष ऑफर्स आणि आकर्षक किंमतींसह ग्राहकांसाठी सज्ज झाले आहेत.

‘ईओआरएस’बद्दल बोलताना मिंत्रा-जॅबाँगचे सीईओ अनंथ नारायणन म्हणाले, ‘ईओआरएस आता येत्या चार दिवसांच्या कालावधीत ‘मिंत्रा’साठी ११ दशलक्ष वैशिष्ट्यपूर्ण नवीन यूजर्स कमावण्यासाठी सज्ज झाला आहे. ६३ दशलक्ष सत्रे आयोजित करण्यासाठी आम्ही तयार असून, गेल्या वर्षीच्या जूनमधील सत्राच्या तुलनेत ४० टक्के अधिक व्यापारवृद्धी साधण्याची आम्ही आशा बाळगतो. डिलिव्हरींचा वेगही १५ टक्क्यांनी वाढवण्यासाठी आम्ही विशेष इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी केली असून, आमच्या किराणा दालनांमध्येही आम्ही वाढ करून आता ५० शहरांतील सात हजार ५०० दुकानांचा अंतर्भाव यंदा आम्ही केला आहे. परिणामी, सेलच्या आठवड्याभरामध्ये ९० टक्के डिलिव्हरी पूर्ण होऊ शकतील. पूर्वीप्रमाणेच द्वितीय व तृतीय श्रेणीतील शहरे ही ‘मिंत्रा’च्या व्यापाराच्या केंद्रस्थानी राहणार असून, या भागातूनच एकूण व्यापाराच्या ६० टक्के व्यापार चालतो. चार दिवसांच्या सेलमध्ये पाच लाख नवे ग्राहक जोडण्याचा ‘मिंत्रा’चा मानस आहे.’

सेलच्या प्रत्येक सत्रामध्ये ‘मिंत्रा’कडून नवीन संकल्पना सादर केल्या जातात. यामुळे ग्राहकांचा खरेदी अनुभव संपन्न होत असून, ब्रॅंडचे ग्राहकांसोबतचे नातेही मजबूत होते. या सत्रासाठी ‘मिंत्रा’ने आपल्या ’प्राइज रिव्हील’ या खास सेलची व्याप्ती दोन दिवसांपर्यंत वाढवली असून, १९ जूनच्या रात्री आठ वाजल्यापासून २१ जूनच्या संध्याकाळी सात वाजेपर्यंत ग्राहक आपली विशलिस्ट बनवू शकतात. ‘अर्ली अ‍ॅक्सेस’ ही नवी संकल्पनाही यंदा ‘मिंत्रा’ने सादर केली असून, या संकल्पनेमुळे प्राइज रिव्हील पिरिएडमध्येही ग्राहक खरेदी करू शकणार आहेत. त्यासाठी निश्चित शूल्क भरणे बंधनकारक राहणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link