Next
‘हायर’तर्फे डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर्सची पंचतारांकित मालिका
प्रेस रिलीज
Wednesday, May 30 | 03:09 PM
15 0 0
Share this story

पुणे : गृहोपयोगी उपकरणे व ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी आणि अनेक प्रमुख उत्पादनांबाबत सलग नऊ वर्षे पहिल्या क्रमांकाचा ब्रॅंड म्हणून मान मिळवणाऱ्या ‘हायर’ने डायरेक्ट कूल (डीजी) रेफ्रिजरेटर्सची नवीन मालिका पंचतारांकित रेटिंगसह जाहीर केली.  

या नवीन डीसी रेफ्रिजरेटर्सच्या श्रेणीमध्ये प्रभावी रचना आणि सुंदर डिझाइनसह अनेक श्रेष्ठ वैशिष्ट्ये आहेत. या रेफ्रिजरेटर्समध्ये उच्च दर्जाचे व हेवी ड्युटी कॉम्प्रेसर्स असून, यामुळे ऊर्जेचा वापर मर्यादित राहतो आणि विजेची बचत होते. हा रेफ्रिजरेटर दिवसभरात विजेची ०.३५ एकके वापरतो. हा वीजवापर दोन सीएफएल बल्ब्जद्वारे वापरल्या जाणाऱ्या विजेपेक्षाही कमी आहे. उच्च दर्जाचा कॉम्प्रेसर असल्याने संपूर्ण रेफ्रिटजरेटमध्ये कार्यक्षम व प्रभावी थंडावा आहे. त्याचप्रमाणे हा थंडावा दीर्घकाळ टिकून राहतो.

या प्रसंगी हायर अप्लायन्सेस इंडियाचे अध्यक्ष एरिक ब्रगांझा म्हणाले, ‘रेफ्रिजरेटर्सची ही नवीन श्रेणी बाजारातील सर्वोच्च रेटिंग्जपैकी एक अशा पंचतारांकित रेटिंगसह बाजारात आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आमच्या ग्राहकांना उच्च दर्जाची उत्पादने देण्याचा वादा राखत आम्ही ही नवीन श्रेणी बाजारात आणली आहे. हे रेफ्रिजरेटर्स अत्यंत कमी ऊर्जा वापरतात आणि पर्यावरण सुरक्षित तसेच स्वच्छ राखण्यात मदत करतात. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत प्रगत सुविधांसह काटेकोरपणे रचना केलेला नवीन डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर म्हणजे आधुनिक शहरी ग्राहकाच्या सर्व गरजा पूर्ण करणारा परिपूर्ण रेफ्रिजरटेर आहे.’   

यामध्ये केवळ एका तासात बर्फ तयार करण्याची विशेष क्षमता आहे. याशिवाय, थंडाव्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये थिक पीयूएफ इन्शुलेशन आणि अधिक लांब कंडेन्सर कॉइल्स आहेत. केवळ एवढेच नाही, तर फाइव्ह स्टार डीसी स्टॅबिलायझरशिवाय चालतो आणि पर्यावरणात प्रदूषण होऊ नये म्हणून क्लोरोफ्लुरोकार्बन अर्थात सीएफसीमुक्त वायूचा वापर करतो. नवीन फाइव्ह स्टार डीसी रेफ्रिजरेटर्स देखण्या ग्लास फिनिशमध्ये उपलब्ध असून, आधुनिक स्वयंपाकघर आणि एकंदर घराला पूरक ठरेल, अशी फुलांची सुंदर नक्षी या फ्रिजवर आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link