Next
पुण्यात ‘गोंदण शब्दांचं’ कार्यक्रम सादर
BOI
Monday, October 15, 2018 | 05:20 PM
15 0 0
Share this article:



पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या वतीने शांता शेळके यांच्या गीतांवर आधारित ‘गोंदण शब्दांचं’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम अनन्वय संस्थेने सादर केला.  

हा कार्यक्रम १४ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी सेनापती बापट रस्त्यावरील नातू सभागृहात झाला. या कार्यक्रमाला काव्य रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘विद्या भवन’चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात ‘कळयांचे दिवस’सारख्या कविता, ‘तोच चंद्रमा’सारख्या गझल, ‘ही वाट दूर जाते’, ‘मागे उभा मंगेश’, ‘जीवलगा’, ‘ऋतू हिरवा’, ‘शारद सुंदर चंदेरी राती’, ‘रेशमाच्या रेघांनी’, ‘ही चाल तुरुतुरू’सारख्या अवीट गाण्यांनी, नाट्य पदांनी, ‘झुरळाच्या लग्नाची वरात’सारख्या बालगीतांनी रसिकांना मोहून टाकले. कवयित्री, गीतकार शांताबाईंच्या प्रतिभासंपन्न गीतांच्या सादरीकरणाने ‘गोंदण शब्दांचं’ कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.



जन्मगावच्या शेळकेवाड्यापासून श्रेष्ठ कवयित्री, प्रतिभासंपन्न गीतकार होण्यापर्यंतचा शांताबाईंचा जीवनप्रवास या कार्यक्रमातून उलगडत गेला. कार्यक्रमाचे दिग्दर्शन डॉ. माधवी वैद्य यांचे होते. कार्यक्रमाची संहिता मुग्धा गोडबोले-रानडे यांची, तर संगीत संयोजन राहुल घोरपडे यांचे होते. मुग्धा रानडे, रमेश पाटणकर यांनी निवेदन केले. अमृता कोलटकर, मीनल पोंक्षे, राहुल घोरपडे यांनी गायन केले.

मिलिंद गुणे, नीलेश श्रीखंडे, आदित्य आपटे यांनी साथसंगत केली. शांता शेळके यांच्या दुर्मिळ ध्वनीचित्रफितीने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली. विश्वास जोशी, डॉ. किरण ठाकूर, सुनील महाजन, अक्का कराड आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search