Next
योगासने करताना घाला सुयोग्य कपडे
प्रेस रिलीज
Friday, June 21, 2019 | 04:21 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : योगामुळे केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नाही, तर मानसिक शांतीदेखील मिळते. यामुळे आजकालच्या धावपळीच्या काळात योगसाधना करणे अत्यंत आवश्यक आहे. योगासने करताना आसने जिथे करणार ती जागा, तिथले वातावरण, आपले कपडे या बाबींचा विचार करणेही महत्त्वाचे आहे. आपली मानसिक अवस्था प्रसन्न असणे गरजेचे असते.  

योगासने करण्यासाठी एक चटई (मॅट), पाण्याची बाटली, एक टॉवेल (घाम टिपण्यासाठी) आणि योग्य कपडे आवश्यक आहेत. आपण वापरत असलेले कपडे कमकुवत असतील तर, आसन करताना ते फाटण्याची शक्यता असते, त्यामुळे योग्य कपडे निवडणे तितकेच महत्त्वाचे आहे. स्पायकर लाइफस्टाइलचे डिझाइन हेड अभिषेक यादव आणि ‘लीवा’ हेड ऑफ डिझाइन नेल्सन जाफरी यांनी योगाभ्यास करण्यासाठी पाच योग्य कपड्यांची माहिती सांगितली आहे.

स्लिम जॉगर्स : ही आधुनिक जॉगर्स ट्रॅक पॅंट असून, आरामदायक तितकीच सुपर-ट्रेंडीसुद्धा आहे. याचे फॅब्रिक आरामदायक आणि मुलायम तर आहेच; पण ते शरीराला चिकटूनही राहत नाही, त्यामुळे योगासने करताना अडचण येत नाही.  

बॅगी क्रॉप टॉप :  १९७० च्या दशकापासून फॅशनमध्ये असलेला क्रॉप टॉप आजही लोकप्रिय आहे. आरामदायी  आणि स्टाइलिश लुक देणारे क्रॉप टॉप व्हिस्कोस आणि कॉटनसारख्या आरामदायक कापडांपासून बनविलेले असतात. 

जिम जीन्स आणि योगा पँँट
जिम जीन्स :  खास खेळाच्या दृष्टीने डेनिमपासून  बनवलेली ही ‘जिम जीन्स’ लवचिक असल्याने योगासने करण्यासाठीसुद्धा उत्तम आहे. नवीन तंत्रज्ञान वापरून याचे फॅब्रिक बनवले आहे, जे लवकर वाळते. त्यामुळे कितीही घाम आला तरी लगेचच कपडे सुकू शकतात.

योगा पॅंट्स : नावाप्रमाणेच योगा करण्यासाठी योग्य अशा या पॅंट्स आहेत. व्हिस्कोससारख्या कपड्यांपासून बनवलेल्या या पॅंट्स केवळ मुलायम किंवा आरामदायी नाहीत, तर दिसायलाही आकर्षक आहेत. 

सायकलिंग शॉर्ट्स : अनेक प्रसिद्ध व्यक्तींना आपण सायकलिंग शॉर्ट्स,  हूडीज आणि टी-शर्टमध्ये पहिले आहे. शरीराला आरामदायक असे हे कपडे असून, मजबूत बांधणी आणि लवचिकपणा ही त्याची मुख्य वैशिष्टये आहेत.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search