Next
उबरपूल ट्रिप्समुळे इंधन आयातीचा खर्च कमी
प्रेस रिलीज
Wednesday, June 06, 2018 | 04:38 PM
15 0 0
Share this story

मुंबई : इंधनाचे दर गगनाला भिडलेले असताना आणि भारताला कच्च्या तेलाच्या आयातीसाठी भलीमोठी रक्कम मोजावी लागत असताना, इंधन आयातीचा खर्च लक्षावधींनी कमी करण्यात केवळ शेअर्ड प्रवासी वाहतूक मदत करू शकते. उबरचे १२ शहरांत सेवा देणारे राइडशेअरिंग उत्पादन उबरपूलने सुरुवात झाल्यापासून देशाचा इंधनावरील आयातखर्च ४.५ दशलक्ष डॉलर्सने कमी करण्यात मदत केली आहे. कंपनीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रसिद्ध केलेल्या ग्रीन इंडेक्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

उबरपूल सेवा प्रथम बेंगळुरूमध्ये सुरू झाली आणि त्यानंतर भारताच्या एकूण १२ शहरांमध्ये या सेवेचा विस्तार झाला. शेअर्ड प्रवासाच्या या सेवेमुळे देशभरातील १० हजार ३४० किलोलीटर इंधन वाचले असून, पर्यायाने इंधन आयातीचा खर्च (७० डॉलर प्रति बॅरल) ४.५ दशलक्ष डॉलरने कमी करण्यात मदत झाली आहे.

याशिवाय उबरपूल उपलब्ध झाल्यामुळे स्वतंत्र प्रवासातील २०० ट्रिलियन किलोमीटर कमी झाले असून, हे अंतर चंद्रावर २८६ वेळा जाणे आणि परत येणे एवढे आहे. एवढेच नाही, तर उबरपूलमुळे भारतातील कार्बनडाय ऑक्साइडचे उत्सर्जन ३६ हजार ५३७ टनांनी कमी झाले असून, हे १९ हजार ३१५ एकरांचे वनक्षेत्र आच्छादणारी ११.५ लशलक्ष झाडे लावण्याच्या बरोबरीचे आहे.

उबरने प्रसिद्ध केलेल्या ग्रीन इंडेक्सनुसार, सर्व शहरांमध्ये शेअर्ड प्रवासाच्या प्रमाणात वर्षागणिक सातत्याने वाढ दिसून येत आहे. पूलच्या सर्वाधिक ट्रिप्सबाबत बेंगळुरू शहराचा क्रमांक पहिला आहे, त्यापाठोपाठ दिल्ली आणि कोलकाता या शहरांचा क्रमांक लागतो. शहरातील एकूण उबरट्रिप्समधील पूलचे प्रमाणही लक्षणीय आहे. कोलकात्यात घेतल्या जाणाऱ्या एकूण ट्रिप्समध्ये पूल ट्रिप्सचे प्रमाण ३९ टक्के आहे, तर त्यापाठोपाठ बेंगळुरूमध्ये हे प्रमाण ३७ टक्के आहे. जवळच्या तसेच दूरच्या अंतरांसाठी खासगी वाहनाला फाटा देऊन सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय स्वीकारण्याचे आणि त्यातही उबरपूलचा वापर करण्याचे प्रमाण वाढत आहे.

हैदराबादमधील एका प्रवाशाने गेल्या वर्षभरात उबरपूलच्या एक हजार ९२१ ट्रिप्स घेतल्या, तर दिल्लीतील एका प्रवाशाने एक हजार ८११ उबरपूल्स ट्रिप्स केल्या. एका शेअर्ड वाहनामध्ये रस्त्यावरील नऊ ते १३ वाहने कमी करण्याची क्षमता आहे, असे जागतिक अभ्यासांतून स्पष्ट होते. बेंगळुरूमधील एका उबर चालकाने वर्षभरात चार हजार ७२३ उबरपूल ट्रिप्स देऊन या कामात लक्षणीय योगदान दिले. देशभरात कोणत्याही चालकाने दिलेल्या ट्रिप्समध्ये ही संख्या सर्वाधिक आहे.

ग्रीन इंडेक्सने प्रसिद्ध केलेल्या निकालांबद्दल उबर इंडिया आणि दक्षिण आशियाचे प्रादेशिक महाव्यवस्थापक प्रभजीत सिंग म्हणाले, ‘देशभरात शेअर्ड प्रवासाचा पर्याय स्वीकारण्याचे प्रमाण वाढत असून, एका सकारात्मक सामाजिक-आर्थिक बदलाला चालना देण्याच्या दृष्टीने तसेच खासगी कारमालकीला पर्याय पुरवण्याच्या दृष्टीने आम्ही करत असलेल्या कामासाठी ही बाब प्रोत्साहनपर आहे. शेअर्ड प्रवासाच्या तंत्रज्ञानामुळे उबरसारख्या कंपन्या, वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांना, पूरक असे काम करू शकत आहेत.’

‘अधिकाधिक शहरातील अधिकाधिक प्रवासी उबरपूल वापरू लागले असून, उबरने पाया घातलेल्या भविष्यकाळासाठी याची मदत होणार आहे: कमी वाहनांमध्ये जास्त प्रवासी, स्वत:च्या गाड्या बाळगणारे कमीत कमी लोक आणि रस्त्यांवर कमीत कमी गाड्या असे या भविष्यकाळाचे स्वरूप आहे,’ असे सिंग यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link