Next
एआयएस-१४० आधारित टेलिमॅटिक्स प्रणाली सादर
प्रेस रिलीज
Saturday, March 03 | 03:11 PM
15 0 0
Share this story


पुणे : केपीआयटीतर्फे भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या २८ नोव्हेंबर २०१६च्या सूचनेला अनुसरून, भारतातील पहिल्या एआरएआय (ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया) प्रमाणित एआयएस (ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड)- १४० वर आधारित, व्हेइकल टेलिमॅटिक्स आणि इर्मजन्सी बटन सोल्युशन्स उपलब्ध करून देत असल्याचे २६ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आले. एक एप्रिल २०१८पासून लागू होणाऱ्या एआयएस-१४० नियमानुसार, आधीपासून अस्तित्वात असलेल्या आणि नव्या अशा सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवेतील वाहनांमध्ये व्हेइकल ट्रॅकिंग (वाहनाचा ठावठिकाणा दर्शविणारे) उपकरण आणि एक किंवा अधिक इमर्जन्सी बटण असणे बंधनकारक आहे.

केपीआयटीची उत्पादने भारतीय कार्यपद्धतीतील परिस्थितीचा विचार करून तयार करण्यात आली आहेत आणि भविष्यकालीन एआयएस-१४०च्या वाटचालीशी ती सुसंगत आहेत. यात व्हेइकल हेल्थ मॉनिटरिंग, सीसीटीव्ही कॅमेरा, पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टम अशी विविध वैशिष्ट्ये आहेत. ही उत्पादने सरकारच्या नियंत्रण केंद्राशी सहज जोडली जातात आणि नियमांमध्ये नमूद केल्याप्रमाणे तातडीचे संदेश (इमर्जन्सी अलर्टस्) पाठवतात. बाजारपेठेत सध्या उपलब्ध असलेल्या आणि नव्या अशा दोन्ही प्रकारच्या वाहनांमध्ये सहज बसवता येईल, अशा प्रकारे याची रचना करण्यात आली आहे.

प्रमाण वैशिष्ट्यांसोबतच या उत्पादनामध्ये बाजारपेठेतील काही प्रथमच वापरली जाणारी वैशिष्ट्ये एकत्र आणण्याचीही तजवीज आहे. यात चालकांच्या सुरक्षेसाठी जर्नी रिस्क मॅनेजमेंट (प्रवास सुरक्षा व्यवस्थापन), सहजसोप्या देखभालीसाठी कॅन बेस्ड डायग्नोस्टिक्स आणि एंड ऑफ लाइन डायग्नोस्टिक्स अशा सुविधांचा समावेश आहे. वाहतूक संचालकांना रिअल-टाइम ट्रॅकिंग, रूट ऑप्टिमायझेशन, चालकाच्या वागणुकीवर लक्ष इत्यादी माध्यमातून अधिक कार्यक्षमता मिळवण्यासाठी केपीआयटीच्या क्लाऊड प्लॅटफॉर्मचाही वापर करता येईल.

केपीआयटीचे अध्यक्ष आणि संचालक मंडळ सदस्य सचिन टिकेकर म्हणाले, ‘एक बुद्धिमान वाहतूक प्रणाली विकसित करण्याच्या दिशेने आखलेल्या भारताच्या सुरक्षा मोहिमेचा भाग बनण्यास आणि त्यायोगे या संदर्भातील सरकारी उपक्रमांना सक्रिय साह्य देण्यास, आम्ही उत्सुक आहोत. एआयएस-१४० टेलिमॅटिक्स प्रणालीची रचना आणि उत्पादन भारतातच करण्यात आले आहे. यातून ‘मेड इन इंडिया, फॉर इंडिया’ची वचनपूर्तताही झाली आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा सर्वांसाठीच सुरक्षित बनावी, यासाठी एआयएस-१४० नियम महत्त्वाची भूमिका बजावेल, असा आम्हाला विश्वास आहे.’ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link