Next
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन
मिलिंद जाधव
Tuesday, March 05, 2019 | 11:25 AM
15 0 0
Share this article:



पालघर : साखरी मोखाडा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन २८ फेब्रुवारी २०१९ रोजी साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनींना शाळेतील विज्ञान शिक्षक दिनेश घनघाव यांनी जादूटोणा कसा केला जातो यावर प्रात्यक्षिके दाखविली.

या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली मोरे, सहशिक्षक धनाजी वायले, मनीषा नलावडे, ज्योती सोनावणे, राजश्री भोये, अर्चना पोळ आदी उपस्थित होत्या. प्रात्यक्षिकांमध्ये विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या.



विद्यार्थिनींमध्ये असलेली अंधश्रद्धा, त्यामुळे त्यांच्या मनात बसलेली भीती आणि दडपण दूर करण्यासाठी घनघाव यांनी प्रात्यक्षिकांबरोबरच त्यांचे प्रबोधनही केले. ‘जगात कुठेही चमत्कार होत नाहीत. विज्ञानाचे प्रयोग दाखवून काही धूर्त बाबा नागरिकांना पैसे घेऊन फसवित असतात, अशा बाबांच्या फसव्या आणि भोंदूगिरीला बळी न पडता त्यावर मात करा आणि आपल्या देशातून बुवाबाजी हटवा,’ असे आवाहन घनघाव यांनी या वेळी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search