Next
सफर मावळची
BOI
Thursday, August 01, 2019 | 11:03 AM
15 0 0
Share this article:

मावळ हा सह्याद्रीच्या सावलीत वसलेला तालुका. सह्यकड्याबरोबरच याला मोठा इतिहासही आहे. जंगल, डोंगर, लेण्या आणि निसर्गाने नटलेल्या मावळाची ओळख ओंकार वर्तले यांनी ‘सफर मावळची’ मधून करून दिली आहे. लेणी, वास्तू, शिल्पे, विहिरी या विभागात नैसर्गिक रांजणखळगे, कार्ला लेणी, पाल-उकसान लेणी, कल्हाटची गिरिशिल्पे, घुमटाची विहीर, टाकवे खुर्द, गधेघळ आदी २६ ठिकाणे आहेत. राजमाचीसह मोगगिरी, इंदोरी, चौराई डोंगर आदी अपरिचित, तसेच गिरिप्रेमींचे आवडते गड-किल्ले यांची माहिती यात दिली आहे. मावळातील प्राचीन घाटवाटा, मंदिरांच्या माहितीचाही समावेश यात आहे. मावळाचा इतिहास कथन करणाऱ्या वारसास्थळांची ओळख यात करून दिली आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे घर, दुर्गप्रेमी साहित्यिक गो. नी. दांडेकर यांचे घर, वडगावच्या ऐतिहासिक लढाईचे स्मारक, महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प आदी स्थळे आहेत. निसर्गाने नटलेल्या मावळातील धबधबे व तेथील खाद्यसंस्कृतीची माहितीही आहे. प्रत्येक ठिकाणाच्या माहितीनंतर तेथे जाण्याचा मार्गही दिला आहे. पर्यटकांसाठी या पुस्तकातील ७० प्रकरणांमधून संपूर्ण मावळ ‘उलगडला’ आहे. 

पुस्तक : सफर मावळची
लेखक : ओंकार वर्तले
प्रकाशन : नावीन्य प्रकाशन
पृष्ठे : २२४ 
मूल्य : २५० रुपये

(‘सफर मावळची हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.) 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 78 Days ago
It certainly deserves a book . Hope , it sells well . Tourist authorities should help in the matter . A documentary ? Copies available for purchase , at tourist offices ?
0
0

Select Language
Share Link
 
Search