Next
‘एस्सर’ने उभारला सर्वात मोठा ओअर हँडलिंग कॉम्प्लेक्स
प्रेस रिलीज
Saturday, July 14, 2018 | 02:26 PM
15 0 0
Share this story

मुंबई, विशाखापट्टणम : एस्सर वैझॅग टर्मिनल लिमिटेडने (ईव्हीटीएल) नव्याने कार्यान्वित केलेला २४ एमटीपीए वैझॅग आयर्न ओअर हँडलिंग कॉम्प्लेक्स देशाला समर्पित करण्यात आला असून, या प्रकल्पाचे उद्घाटन रस्ते वाहतूक व महामार्ग, शिपिंग व जल संसाधने मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.

‘वैझॅग आयर्न ओअर हँडलिंग कॉम्प्लेक्स हा प्रकल्प म्हणजे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय संपत्ती आहे. सरकारने बंदरप्रणित विकासाचे पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’ असे ‘एस्सर’चे संचालक प्रशांत रुईया यांनी सांगितले.

अद्ययावत कार्गो हाताळणी उपकरण असलेल्या आयर्न ओअर हँडलिंग कॉम्प्लेक्समध्ये भारतीय बंदरांमध्ये सर्वात जलद व्हेसल टर्नअराउंड टाइम असेल. प्रकल्प पूर्ण झाल्यावर प्रकल्पाची कार्गो हाताळणी क्षमता २४ एमटीपीएपर्यंत वाढवण्यात आली आहे. आयर्न ओअर हँडलिंग कॉम्प्लेक्समध्ये आता वैझॅग बंदराच्या आउटर हार्बरवर, २० मीटर खोलीपर्यंत, दोन लाख डीडब्लूटीपर्यंत सुपर केपसाइज व्हेसल बर्थ करणे शक्य आहे.

आयर्न ओअर हँडलिंग कॉम्प्लेक्स पर्यावरणपूरक करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले. यांत्रिकीकरण व पर्यावरणाचे शाश्वत संरक्षण या दृष्टीने जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींवर भर दिल्याने डस्ट एमिशन व स्पिलेजमध्ये लक्षणीय घट झाली आहे व त्यामुळे कार्बनचे प्रमाण कमी झाले आहे व बंदरावर काम करण्यासाठी परिस्थिती अधिक सुधारली आहे. ‘ईव्हीटीएल’ने संपूर्ण ९.५ किमीचे कन्व्हेअर जाळेही सक्षम केले आहे व पीएलसी ऑटोमेशनमध्ये अपग्रेड केले आहे, त्यामुळे विक्रमी कार्गो हाताळणी करता येईल.

‘ईव्हीटीएल’ने ३० वर्षे कालावधीसाठी डिझाइन-बिल्ड-फायनान्स-ऑपरेट-ट्रान्स्फर (डीबीएफओटी) पद्धतीने २०१५मध्ये हा प्रकल्प हाती घेतला. आयर्न ओअर हँडलिंग कॉम्प्लेक्स सर्व हवामानांसाठी, डीप ड्राफ्ट सुविधा असून, ती चीन, जपान व कोरिया यासह झपाट्याने वाढत्या आग्नेय आशियाला सेवा देण्यासाठी सज्ज आहे. या प्रकल्पाने कार्गोसाठी छत्तीसगड, ओडिशा व झारखंड येथून विशेष रेल्वे कनेक्टिविटी निर्माण केली आहे.

एस्सर पोर्ट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजीव अग्रवाल म्हणाले, ‘या प्रकल्पामुळे पूर्व किनाऱ्यावरील निर्यातकांना लहान टर्नअराउंड टाइम्स व घटलेली फ्रेट कॉस्ट असा फायदा होईल. या सुविधेमुळे निर्यात व किनारवर्ती वाहतूक या दोन्हींना मदत होईल, तसेच सागरमला उपक्रमाचा हेतूही साध्य केला जाईल. हा विस्तार प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत केल्याबद्दल आम्ही वैझॅग बंदर अधिकाऱ्यांचे आम्ही आभारी आहोत.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link