Next
महिलांमध्ये आरोग्याबद्दल जागृती करण्यासाठी कार्यक्रम
प्रेस रिलीज
Monday, June 19, 2017 | 06:57 PM
15 0 0
Share this article:

चंद्रपूर : शरीर स्वस्थ तर मन स्वस्थ; पण आजही अनेक गावे अनेक रोगांनी त्रस्त आहेत. कारण त्या लोकांना अनेक विषयांवरील माहिती मिळत नाही किंवा तेथील गावकरी काही विषयावरील माहिती घेण्याबाबत मनात भीती किंवा संकोच बाळगतात. याच कारणाने अनेक रोगांवर, मुख्यत: गुप्तरोगांवर महिलांना संस्कारित करण्याचा प्रयत्न मैत्री परिवार संस्था, डॉ. दंदे फाउंडेशन आणि स्वानंदी महिला बहुउद्देशीय संस्था यांनी केला. या सर्वांच्या सहकार्याने चंद्रपूर जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील येलचील या गावात १५० महिलांची गुप्तरोग तपासणी करण्यात आली. तसेच ‘सी. आन. अॅग्रो इंडस्ट्रीज’तर्फे क्लॅरेन सॅनिटिरी नॅपकिनचे वाटपही करण्यात आले. गावातील महिलांना किमान तीन महिने पुरतील इतके नॅपकिन संस्थेकडून देण्यात आले.

डॉ. पिनाक दंदे, मैत्री परिवाराचे अध्यक्ष संजय भेंडे, अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टाणपे, पीएसआय सतीश जगताप, ग्रामसेविका सौ. गगनवार, सरपंच कुमुद दुधी, गडचिरोली जिल्हा को-ऑप. बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, तसेच डॉ. सीमा दंदे, ऋतुजा गडकरी, अॅड. गौरी चांद्रायण हे कार्यक्रमाला उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी गावातील रोगांविषयीची माहिती व गावकऱ्यांची मानसिकता याविषयी आपले विचार मांडले. मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष संजय भेंडे यांनी गावातील रोग दूर करण्याकरिता शरीर स्वच्छ ठेवणे, आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, तसेच गाव स्वच्छ ठेवणे याच्या आवश्यकतेबद्दल सांगितले. मुलांनी मातीशी खेळलेच पाहिजे; पण सोबतच स्वच्छताही असली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. डॉ. सीमा दंदे व अॅड. गौरी चांद्रायण यांनी महिलांच्या गुप्तरोगांविषयी व काही रोगांविषयी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता भूषण पोटवडे, राज हनुमंते, श्री. रांजणे, विभागातील पोलीस, तसेच मीरा जथे, माधुरी यावलकर, अर्चना कोत्तेवार, संपदा आपटे, विजेता तिवारी, अपर्णा मनोहर, विनेता सोनी, मनीषा गर्गे, विजय जथे, सुहास खरे, दिलीप ठाकरे, सुरेश डंबोळे यांचे सहकार्य लाभले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search