Next
या सचिनचा असाही सिक्सर..
सहा चित्रपटांचा कार्यकारी निर्माता सचिन दुबाले पाटील
BOI
Friday, January 04, 2019 | 05:05 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘सचिन’ हे नाव प्रत्येक माणसाच्या हृदयाजवळचे. या नावाची जादूच अशी आहे. भारतरत्न सचिन तेंडूलकर, सचिन पिळगावकर यांनी या नावाला एक वलय प्राप्त करून दिले आहे. या नावाचा हा वारसा घेऊन आणखी एक सचिन आपले नाव गाजवण्यास सज्ज झाला आहे, तो म्हणजे सचिन दुबाले पाटील. अल्पावधीत सहा चित्रपटांचा कार्यकारी निर्माता बनलेल्या सचिनने सिक्सरच ठोकला आहे.  

सध्या चित्रपटसृष्टीत त्याच्या नावाचे वादळ घोंगावत आहे. मूळचा बीडचा असणारा हा युवक कामानिमित्ताने पुण्यात आला. अत्यंत बिकट परिस्थितीला तोंड देत त्याने मिळेल ते काम करायला सुरुवात केली. आज तो मराठी चित्रपटांचा कार्यकारी निर्माता बनला आहे. जवळपास अर्धा डझन चित्रपटांसाठी कार्यकारी निर्माता म्हणून त्याने चोख कामगिरी बजावली आहे. मोठ्या हिमतीने तो या अस्थिर चित्रपटसृष्टीत प्रामाणिकपणे काम करतोय. बहुचर्चित बिग बजेट, मल्टीस्टारकास्ट ‘अ. ब. क’ या चित्रपटाचा कार्यकारी निर्माता म्हणूनही त्याने धुरा संभाळली होती. 

आटपाडी नाईट्स, खिचीक, कॉलेज डायरी असे त्याचे चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. सचिनला या वाटचालीत साथ मिळाली आहे ती त्याचा जीवाभावाचा मित्र विष्णू घोरपडे याची. आता ही घोडदौड अशीच कायम ठेवायची सचिनची महत्त्वाकांक्षा आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link