Next
कल्याण ज्वेलर्सने वितरित केले ३१७ किलो सोने
जागतिक ३०० केजी गिव्ह अवे अभियानाला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Wednesday, June 19, 2019 | 12:22 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : कल्याण ज्वेलर्स या भारतातील विश्वासार्ह व आघाडीच्या ज्वेलरी ब्रँडने जागतिक ‘३०० केजी गिव्ह अवे’ अभियानांतर्गत एकूण ३१७ किलो सोने वितरित केल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. अक्षय्यतृतीयेच्या आधी सुरू झालेले हे अभियान १० जून २०१९ रोजी संपले. कंपनीला अगोदर नमूद केलेल्या मूल्यानुसार अतिरिक्त १७ किलो सोने द्यावे लागल्याने या अभियानाला प्रचंड प्रतिसाद व यश मिळाले.

‘३०० केजी गिव्ह अवे’ स्पर्धेमध्ये १०० गोल्ड कॉइनसाठी ४६ नशीबवान विजेत्यांचा ग्राहकांनी खरेदीदरम्यान मूल्यवर्धित म्हणून मिळवलेल्या मोफत गोल्ड कॉइनचा समावेश होता. मुंबईमध्ये इलेक्ट्रॉनिक रॅफल पद्धतीने नशीबवान विजेत्यांची निवड करण्यात आली. यूएई, कतार, ओमान व कुवेत येथील विजेत्यांची निवड त्या-त्या देशांतील लकी ड्रॉद्वारे करण्यात आली. अभियानाच्या सुरुवातीला जाहीर केल्याप्रमाणे, भारतातून १२, यूएईतून १८, कतारमधून सात, ओमानमधून पाच व कुवेतमधून चार विजेत्यांची निवड करण्यात आली. 

किमान २५ हजार रुपयांच्या खरेदीवर ग्राहकांना मोफत गोल्ड कॉइन देण्यात आले आणि एप्रिल ते जून या दरम्यान करण्यात आलेल्या सर्व खरेदीवर सर्व शोरूममध्ये एक ग्रॅम, ५०० एमजी, ४०० एमजी व १०० एमजी वजनाची गोल्ड कॉइन देण्यात आली. 

या विषयी बोलताना कल्याण ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टी. एस. कल्याणरामन म्हणाले, ‘सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि अभियानाच्या कालावधीत खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांचे आभार. कल्याण ज्वेलर्समध्ये, ग्राहकांना खरेदी करण्याचा उत्तम अनुभव मिळण्याबरोबरच, त्यांना खरेदीचे मूल्य मिळावे, यासाठी विविध सवलती व अभियान राबवण्याचा आमचा प्रयत्न असतो. यातूनच या अभियानाचे आयोजन केले होते. आमच्या ग्राहकांचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही थोडेफार योगदान देऊ शकलो, याचे समाधान वाटते.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search