Next
‘दीनानाथ’मध्ये जागतिक हृदय दिन साजरा
प्रेस रिलीज
Wednesday, October 04, 2017 | 11:52 AM
15 0 0
Share this article:

पुणे : जागतिक हृदय दिनानिमित्त दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलतर्फे हृदय रुग्णांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘हेल्दी हार्ट क्लब’ आणि ‘डॉक्टर्स इलेव्हन’ यांच्यात क्रिकेट मॅच घेण्यात आली. व्हीजन क्रिकेट ग्राऊंड (वडगाव फ्लायओव्हर जवळ, सिंहगड रस्ता) येथे झालेल्या क्रिकेट मॅचमध्ये ‘हेल्दी हार्ट क्लब’ विजयी झाला.

हृदयरोगाबाबत जनजागृतीसाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या सभागृहात कार्यक्रम घेण्यात आला. हृदयरोग शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. शिरीष साठे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी हृदयरोग आणि हृदय शल्यचिकित्सा विभागाचे तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.

डॉ. साठे म्हणाले, ‘जागतिक हृदयदिनानिमित्त हृदयरोगाबाबत जनजागृती करणे हा या क्रिकेट स्पर्धेचा प्रमुख हेतू होता. तंबाखू सेवन, अतिमद्यपान, व्यायामाचा अभाव, आहाराचा अनियमितपणा या गोष्टी टाळल्या, तर ८५ टक्के लोकांमध्ये हृदयरोगामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण टाळता येऊ शकते. त्यामुळे याबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.’

या वेळी जागतिक हृदय दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील रुग्णांचा विशेष सत्कार क्रिकेटर मिलिंद गुंजाळ यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये तीन महिन्यांत कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवणे, वजनावरील नियंत्रण आणि मधुमेहावरील नियंत्रण या स्पर्धांचा समावेश होता.

या प्रसंगी खेळाडूंच्या फिटनेसचे किस्से मिलिंद गुंजाळ यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘कपिल देव यांचा सुरुवातीचा व्यायाम पाच ते सात किमी पळणे, भरपूर दूध पिणे असा असायचा. गावसकर यांचा डाएट कंट्रोल, फीटनेस अजूनही चांगला आहे. जलतरणपटू अमर आढाव याने १६ वेळा सिंहगड चढून लिमका रेकॉर्ड केले. खेळाडूंनी मनाने खंबीर असणे महत्त्वाचे असते. खेळाडूंच्या जेवण्याच्या, व्यायामाच्या वेळा ठरलेल्या असतात. त्या कसोशीने पाळतात.’

ते पुढे म्हणाले, ‘खेळातून प्रेरणा आणि ताकद मिळते. माझ्या वडिलांनी आजारपणाची एकही रजा घेतली नाही. मीसुद्धा एकही वैद्यकीय बिल कंपनीकडे पाठविले नाही. ‘खेळून आनंदी रहा, फिट रहा’ हा संदेश चांगल्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल.’

कार्डियाक रिहॅबच्या टीमने या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. डॉ. शिरीष साठे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि  प्रास्ताविक केले, तर डॉ. आफताब यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search