Next
‘प्रोमॅक्स अॅवॉर्ड्स’मध्ये ‘स्टार प्रवाह’चे रूपेरी यश
प्रेस रिलीज
Tuesday, May 29 | 04:58 PM
15 0 0
Share this story

मुंबई : टेलिव्हिजन आणि जाहिरात क्षेत्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘प्रोमॅक्स अॅवॉर्ड्स’मध्ये ‘स्टार प्रवाह’ने बाजी मारली आहे. ‘विठूमाऊली’च्या बेस्ट मार्केटिंग कॅम्पेनसाठी रौप्यपदक आणि ‘शतदा प्रेम करावे’च्या बेस्ट प्रोमोसाठी रौप्यपदक हे दोन पुरस्कार ‘स्टार प्रवाह’ने पटकावले. या पुरस्कारांच्या निमित्ताने ‘प्रवाह’चा राष्ट्रीय स्तरावर सन्मान करण्यात आला.

‘विठूमाऊली’ मालिकेसाठी ‘स्टार प्रवाह’ची ‘बेस्ट नॅशनल इंटिग्रेटेड कॅम्पेन’ विभागात मराठीसह हिंदी आणि इंग्रजी चॅनेल्सबरोबर स्पर्धा होती; मात्र, त्यात स्टार प्रवाह वाहिनी सरस ठरली. विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे या मालिकेला घराघरात पोहोचवण्यासाठी टीव्ही, वृत्तपत्र, रेडिओ, सोशल मिडीया अशा नेहमीच्या माध्यमांसह कीर्तन आणि वासुदेव या लोककला, ऑगमेंटेड रिअॅलिटी या माध्यमांचाही वापर करण्यात आला होता. ऑगमेंटेड रिअॅलिटी, कीर्तन आणि वासुदेव या लोककलांचा केलेला वापर हेच ‘विठूमाऊली’च्या कॅम्पेनचे वेगळेपण ठरले आणि राष्ट्रीय स्तरावर सिल्व्हर अॅवॉर्ड मिळाले. या पुरस्काराच्या निमित्ताने ‘स्टार प्रवाह’च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय.

‘शतदा प्रेम करावे’च्या प्रोमो कॅम्पेनची स्पर्धा हिंदी आणि इंग्रजी चॅनेल्स वगळता इतर प्रादेशिक चॅनेलबरोबर होती. त्यात ‘शतदा प्रेम करावे’ला सिल्व्हर अॅवॉर्ड मिळाले. या कॅम्पेनसाठी टीव्ही, सोशल मिडीया अशा माध्यमांचा वापर करण्यात आला होता. ‘विठूमाऊली’ आणि ‘शतदा प्रेम करावे’ या दोन्ही मालिकांना महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link