Next
मुंबईकरांना यंदा जास्त पगारवाढीची अपेक्षा
‘शाइन डॉट कॉम’च्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष
प्रेस रिलीज
Saturday, April 20, 2019 | 05:45 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : आर्थिक राजधानी मुंबईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यंदा २० टक्के पेक्षा जास्त पगारवाढीची अपेक्षा असून, तुलनेत दिल्ली-एनसीआर आणि बंगळूरमधील कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारात फक्त शून्य ते दहा टक्के वाढ होईल, असे वाटत असल्याचा निष्कर्ष ‘शाइन डॉट कॉम’ या  जॉब पोर्टलने अलीकडेच केलेल्या उमेदवार-केंद्री अप्रेझल सर्वेक्षणातून काढला आहे. 

एचआर किंवा कंपनीच्या दृष्टीकोनाऐवजी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांवर केंद्रित हे सर्वेक्षण आयटी, बँकिंग आणि फायनान्स, औद्योगिक उत्पादने, शिक्षण-प्रशिक्षण, ‘एफएमसीजी’ आदींसारख्या विविध उद्योगांतील व्यावसायिकांमध्ये करण्यात आले.     

मुंबई, पुणे आणि चेन्नई यांसारख्या शहरात काम करणाऱ्या व्यावसायिकांना २० टक्क्यांपेक्षा जास्त पगारवाढीची अपेक्षा असल्याचे या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. मुंबईतील सुमारे ३७ टक्के लोकांना ही अपेक्षा आहे. पुणे आणि चेन्नई येथील ही आकडेवारी अनुक्रमे ३६ टक्के आणि ३८ टक्के आहे. भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणजे बंगळूर येथे २१ टक्के लोकांना त्यांच्या पगारात दहा टक्क्यापर्यंत वाढ होईल, असे वाटते आहे. देशाची राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये २० टक्के लोकांना कमी पगारवाढ होईल असे वाटते.

‘शाइन डॉट कॉम’च्या सर्वेक्षणात निदर्शनास आलेली आणखी एक महत्वपूर्ण बाब म्हणजे, मुंबईतील शिक्षण-प्रशिक्षण क्षेत्रातील तब्बल ६२ टक्के कर्मचारी २० टक्क्यांपेक्षा जास्त पगारवाढीची अपेक्षा करत आहेत, तर ऑटो क्षेत्रातील सुमारे ५६ टक्के कर्मचाऱ्यांनाही तितक्याच वाढीची अपेक्षा आहे. पुण्यातील ऑटो क्षेत्रातील ४८ टक्के आणि शिक्षण-प्रशिक्षण क्षेत्रातील ३८ टक्के कर्मचाऱ्यांना २० टक्क्यांपेक्षा जास्त वाढीची अपेक्षा आहे. या दोन्ही शहरांमध्ये बहुतांशी क्षेत्रात दमदार वाढ होत आहे आणि एकत्रितरित्या त्यांचे अप्रेझल सेंटीमेंट देशात सर्वात जास्त आहे.

‘बीएफएसआय’ आणि ‘बीपीओ-केपीओ-आयटीईएस’ क्षेत्रातील व्यावसायिकांमधील अप्रेझल सेंटीमेंट सर्वात उच्च असल्याचे पगारवाढीच्या अपेक्षांच्या क्षेत्रवार विश्लेषणातून स्पष्ट होते. या क्षेत्रातील ३५ टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना २० टक्क्यांपेक्षा जास्त पगारवाढीची अपेक्षा आहे. 

या सर्वेक्षणाबद्दल बोलताना ‘शाइन डॉट कॉम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी झाइरस मास्टर म्हणाले, ‘विविध मेट्रो शहरे आणि क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांमध्ये अंतर आहे. बहुतांशी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा उच्च असल्या, तरी सर्वच संस्था काही या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाहीत. ‘शाइन डॉट कॉम’वर आम्ही अप्रेझलच्या सत्रानंतर आम्ही आमच्या पोर्टलवर रोजगाराच्या शोधात असलेल्यांची सक्रिय उमेदवारांची संख्या वाढवण्यासाठी सिद्ध आहोत. नेहमीप्रमाणे, आम्ही त्यांना त्यांचे कौशल्य आणि अपेक्षा यानुरूप त्यांना नोकरी सुचवण्यासाठी सर्व प्रयत्न करू, तसेच आमच्या शाइन लर्निंग प्लॅटफॉर्मद्वारे त्यांना त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी व दीर्घकालीन करियर ग्रोथसाठी सक्षम बनण्याची संधीदेखील देऊ.’

या सर्वेक्षणात सामील झालेले प्रतिसादकर्ते प्रामुख्याने मुंबई (१९.४९ टक्के), दिल्ली-एनसीआर (२०.८९), बंगळूर (२०.८९), हैदराबाद (१६.४३), पुणे (९.३४) आणि चेन्नई (११.६४) या  महानगरांमधील होते. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search