Next
मराठी लेखकाला पहिल्यांदाच मिळणार नफ्यातला वाटा
लेखकांचे भविष्य ठरवणारे सकारात्मक पाऊल
BOI
Saturday, September 08, 2018 | 05:11 PM
15 0 0
Share this article:

हृषीकेश कोळी

निर्माते विश्वास जोशी ‘घ्ये डबल’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या तयारीत असून विल्यम शेक्सपिअरच्या ‘कॉमेडी ऑफ डबल’ या नाटकावर आधारित हा चित्रपट असणार आहे. विशेष बाब म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून विश्वास जोशी यांनी एक नवे पाऊल उचलले आहे. ते म्हणजे,  चित्रपटाच्या लेखकाला नफ्यातला १० टक्के वाटा मिळणार आहे.

विश्वास जोशी‘व्हॉट्स अॅप लग्न’ आणि ‘नटसम्राट’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांचे निर्माते विश्वास जोशी आता आपल्या तिसऱ्या चित्रपटाच्या तयारीत आहेत. ‘फिनक्राफ्ट मिडिया अँड एंटरटेनमेंट’ ही त्यांची संस्था सध्या आगामी ‘घ्ये डबल’ या चित्रपटावर काम करत आहे. ‘कॉमेडी ऑफ डबल’ या नाटकावर आधारित हा एक विनोदी चित्रपट आहे. विशेष म्हणजे ‘शेक्सपिअर’च्या लिखानावर येत असलेला हा मराठीतील पहिलाच चित्रपट आहे. स्वतः विश्वास जोशी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून चित्रपटाची पटकथा आणि संवाद दोन्हीही ऋषिकेश कोळी याने लिहिले आहेत. 

सध्या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरू असून त्यादरम्यान विश्वास जोशी यांनी घेतलेला हा नफ्याचा निर्णय लेखकासाठी आनंददायी आहे. हा निर्णय लेखकांच्या भविष्याच्या दृष्टीने नक्कीच काहीतरी मोठा बदल घडवणारा ठरेल अशी आशा आहे. इतकेच नाही, तर भविष्यात हा चित्रपट मराठीव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेत प्रदर्शित झाल्यास त्याच्या नफ्यातील १० टक्के रक्कमही लेखकाला मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.    
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search