Next
निसर्गमित्र पुरस्कार अमृता राणे यांना जाहीर
गुरुवारी पुण्यात पुरस्कार वितरण सोहळा
BOI
Saturday, January 05, 2019 | 02:58 PM
15 0 0
Share this article:

पक्षी अभ्यासक अमृता राणे

पुणे : निसर्ग, पर्यावरण संवर्धन, ट्रेकिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या अॅड-व्हेंचर फाउंडेशन संस्थेतर्फे देण्यात येणारा निसर्गमित्र पुरस्कार यंदा पक्षी अभ्यासक अमृता राणे यांना जाहीर झाला आहे. 

‘अॅड-व्हेंचर फाउंडेशनचा हा १३ वा श्री. मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार अमृता राणे यांना येत्या गुरुवारी पुण्यात माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक दिनेशकुमार उपस्थित राहणार आहेत. नवी पेठ येथील एस. एम. जोशी सभागृहात सायंकाळी सहा वाजता हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे’, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विवेक देशपांडे यांनी दिली. 


‘अमृता राणे यांनी अरुणाचल प्रदेशमधील पाक्के राष्ट्रीय उद्यानात धनेश (हॉर्नबिल) पक्ष्यांचे संवर्धन आणि त्यांच्या घरट्यांचे रक्षण करण्याचे काम केले. तब्बल चार वर्षे ती एकटी या अभयारण्यात राहिली. निशी या आदिम जमातीतील लोकांच्या मदतीने तिने निसर्गपर्यटन केंद्र सुरू केले. या पक्ष्यांच्या अवैध व्यापारावरही बंधने आणली. अमृता राणे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून वनस्पती शास्त्रात बी. एस्सी पदवी प्राप्त केली असून, इंग्लंडमधील ईस्ट अजेलीया विद्यापीठातून परीसंस्थाशास्त्र आणि संवर्धन या विषयात एम. एस्सी पदवी घेतली आहे. मॉरिशसमधील ‘वाईल्ड लाईफ फाउंडेशन’ संस्थेत सहायक संशोधक म्हणून काम केले. ऋतूजैविकी क्षेत्रात विशेष रस असल्याने त्या पक्षी संवर्धनाच्या कामाकडे ओढल्या गेल्या. त्यांच्या या क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे’, असेही देशपांडे यांनी सांगितले. 


पुरस्कार सोहळ्या दरम्यान, अमृता राणे यांच्याशी विवेक देशपांडे आणि अनुज खरे संवाद साधणार असून, पाक्के अभयारण्यातील धनेश पक्ष्यांवर आधारीत स्लाईड शो आणि व्हिडिओ सादर करण्यात येणार आहे. 

कार्यक्रमाविषयी 
निसर्गमित्र पुरस्कार वितरण 
स्थळ : एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ.
दिवस व वेळ : गुरुवार, दि. १० जानेवारी, सायंकाळी सहा वाजता.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
दिपक दत्ता भोर उदापूर ता जुन्नर जि पुणे About 167 Days ago
सार्थ अभिमान कष्ट करणारा कुणी असो चिद़ चिकाटी निसर्गावर जीवापाड प्रेम करणारा मानवाला माझा त्रिवार वंदन
0
0

Select Language
Share Link
 
Search