Next
‘कौशल्य प्राप्त करून सर्वोत्तम व्हा’
हणमंतराव गायकवाड यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Thursday, August 30, 2018 | 06:03 PM
15 0 0
Share this article:

बीव्हीजी उद्योग समुहाचे संस्थापक हणमंतराव गायकवाड
पुणेः ‘दररोज नवीन काहीतरी शिकायचा प्रयत्न करा आणि जगाच्या पाठीवर कुठेही काम करण्याची तयारी ठेवा. आजच्या जगामध्ये नुसते बरे किंवा चांगले असून चालत नाही; तर सर्वोत्तम व्हावे लागते. त्यामुळे कौशल्ये प्राप्त करून ज्ञानाचे आणि जगाचे दरवाजे उघडे करा’, असे प्रतिपादन बीव्हीजी उद्योग समुहाचे संस्थापक हणमंतराव गायकवाड यांनी केले. 

‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’च्या ‘प्रॅक्टिकल बीकॉम’च्या उदघाटन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी ‘एमपीटीए एज्युकेशन’चे व्यवस्थापकीय संचालक सदानंद देशपांडे, ‘आयएमसीसी’चे कार्यवाहक संचालक डॉ. संतोष देशपांडे, ‘प्रॅक्टिकल एज्युस्किल्स’चे संचालक सन्मित शहा, अमिता शहा आदी उपस्थित होते. 

प्रॅक्टिकल बी.कॉम अभ्यासक्रमात इंडस्ट्रियल अकाउंटिंग आणि टॅक्सेशन विषयातील प्रात्यक्षिक ज्ञान, द्वितीय वर्षीपासून ऑन-दि-जॉब ट्रेनिंग देत विद्यार्थ्यांची कौशल्ये विकसित केली जातात; तसेच बी. कॉम पूर्ण होईपर्यंत दोन वर्षांचा अनुभव व सुमारे दोन लाख रुपयांपर्यंत विद्यावेतन आणि विद्यापीठाची बी.कॉम पदवीदेखील विद्यार्थ्यांना मिळते.

या वेळी सदानंद देशपांडे म्हणाले, ‘देशात वर्ष २०१३-१४ मध्ये चार कोटी थेट प्राप्तिकर दाते होते, आता पाच वर्षांमध्ये तो आकडा सहा कोटी ७५ लाखांवर गेला आहे. या सर्व करदात्यांना अकाउंटंटची भासते. वाणिज्य शिक्षणाशिवाय कोणताही उद्योग, संस्था चालू शकत नाही. पारंपरिक शिक्षण व्यवस्था ही कायम वरातीमागून घोडे अशी चालते. प्रशासकीय वर्तुळ पूर्ण करून, पारंपरिक अभ्यासक्रमात बदल होईपर्यंत प्रत्यक्षात उद्योगक्षेत्रात लागणारी कौशल्य बदललेली असतात. म्हणून प्रॅक्टिकल बी. कॉमसारखे अॅप्रेंटिसशिप प्रोग्रॅम महत्त्वाचे आहेत.’

‘जिथे काम करता तिथे तन, मन लावून काम केले, तर तुमची भरभराट होईल. सचोटी म्हणजे तुमच्याकडे कोणी बघत नसताना तुम्ही कसे वागत असता. कौशल्याबरोबरच प्रोफेशनलिझम यावर तुम्हाला मिळणारे यश अवलंबून असते’, असेही देशपांडे यांनी सांगितले. 

कार्यक्रमाला प्रॅक्टिकल बी. कॉमचे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन्मित शहा यांनी प्रास्ताविक केले. जीतेंद्र खेलानी यांनी आभारप्रदर्शन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search