Next
भारतीय विद्या भवनमध्ये १९ जुलैला ‘गीतबहार’ कार्यक्रम
प्रेस रिलीज
Monday, July 15, 2019 | 12:32 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘गीतबहार’ या लोकप्रिय हिंदी-मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुभांगी मुळे प्रस्तुत हा कार्यक्रम १९ जुलै २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजता भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात होणार आहे,’ अशी माहिती भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.

या कार्यक्रमात शुभांगी मुळे, हेमंत वाळुंजकर हे गण, गवळण, लावणी याचबरोबर हिंदी-मराठी गीत अशा विविध रचना सादर करणार आहेत. केदार परांजपे, जयंत साने, मोहन पारसनीस, हेमंत पोटफोडे हे कलाकार साथसंगत करणार असून, मीरा ठकार कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ७९ वा कार्यक्रम असून, हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.

कार्यक्रमाविषयी : 
दिवस : शुक्रवार, १९ जुलै २०१९ 
वेळ : सायंकाळी सहा वाजता 
स्थळ : भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता, पुणे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search