Next
‘काँग्रेस व ‘राष्ट्रवादी’ एकत्रित निवडणुका लढवणार’
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती
प्रेस रिलीज
Tuesday, January 08, 2019 | 05:47 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘सध्या राजकीय आघाड्या, युती याबाबत चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष या दोन्ही पक्षाच्या विविध बैठका पार पडल्या आहेत. त्यामध्ये काही मित्रपक्षांना सोबत घेण्याचा निर्णय झाल्यानंतर त्यांच्याशी चर्चा झाली आहे. एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये निवडणुका एकत्रित लढवण्याबाबत एकमत झालेले आहे. ४० जागांवर एकमत झाले आहे. अजून आठ जागांचा निर्णय अनिर्णित आहे,’ अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, ‘या जागांबाबत केंद्रामध्ये चर्चा होऊन निर्णय होणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये सहा जानेवारीला बैठक झाली. या बैठकीमध्ये जे मित्रपक्ष आहेत. त्यांना किती जागा आणि कुठल्या जागा द्यायच्या याबाबत निर्णय व्हावा अशी चर्चा झाली. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलून तो विषय संपवावा असे ठरले आहे. या वेळी अशोक चव्हाण यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठलाही ज्येष्ठ नेता सोबत राहिल असेही ठरले.’  

‘सीपीएमच्या काही मागण्या आहेत. त्याबाबत निर्णय घेतला पाहिजे. शेतकरी संघटनेची मागणी आहे त्याच्यावर निर्णय घ्यावा आणि पीडब्ल्यूपी, समाजवादी पक्ष, सीपीआय आणि रिपब्लिकन पक्षाचे गट असे काही पक्ष आहेत जे लोकसभेची निवडणूक लढवणार नाहीत मात्र, आघाडीमध्ये राहतील त्यांना विधानसभेत काही जागा हव्या आहेत. कवाडे लोकसभा लढणार नाही; परंतु विधानसभेसाठी त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे काही लोक आहेत. एकूणच राज्यात दोन्ही पक्षांची आघाडी निश्चित आहे. काही पक्ष लोकसभा लढवणार नाहीत त्यांचाही होकार आहे. शेतकरी संघटनेबाबत चर्चा सुरू आहे,’  अशी माहिती मलिक यांनी दिली.

१५ जानेवारीच्या अगोदर हा सगळा विषय संपवला जाईल, असा निर्णय रविवारच्या बैठकीत झाला असल्याचे सांगून  १५ जानेवारीला पुन्हा मकरसंक्रातीला दोन्ही काँग्रेस आणि इतर पक्ष आहेत त्यांच्याशी बोलणी फायनल होणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search