Next
‘एमटीव्ही डेटिंग इन द डार्क’ आठ जूनपासून
प्रेस रिलीज
Thursday, June 07, 2018 | 05:44 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘एमटीव्ही डेटिंग इन द डार्क’ हा शो एमटीव्हीवर आठ जूनपासून दर शुक्रवारी सायंकाळी आठ वाजता दाखवला आजार आहे. यात दोन अशा प्रेमी दाखवले जाणार आहेत ज्यांनी एकमेकांना कधी पाहिले नाही. हा शो प्रेक्षकांना उत्साहित करणार आहेच शिवाय आपल्या ‘होऊ शकणार्‍या साथीदारा’शी अंधारात सूर जुळवण्यासाठी सहभागींना आपल्या सर्व जाणीवांची कमाल क्षमता जोखायला लावणार आहे. या सीझनची निवेदिका मोरोक्कन सुंदरी नोरा फतेही या स्पर्धकांसाठी अंधारातील अप्रतिम डेट्सचे सूत्रसंचालन करणार आहे

‘एमटीव्ही डेटिंग इन द डार्क’ हा एक डेटिंग रिअॅलिटी शो आहे. आसपास गूढ वातावरणाची निर्मिती करत हा शो उत्सुकतेचा पारा वर चढवणार आहे. सगळे काही आठवायचे किंवा काहीच नाही आठवू नये, हे एक प्रकारचे साहसच आहे. आंतरराष्ट्रीय फॉरमॅटवर बेतलेला हा शो तीन सिंगल पुरुष आणि तीन सिंगल स्त्रियांना सर्व प्रकारचे संकोच मागे टाकत आपल्या अंत:मनावर विश्‍वास ठेवत काही उत्साहपूर्ण करण्याची संधी देत आहे. ही ग्रुप डेट अंधारात असेल. अंधारातच हे सगळे सिंगल एकमेकांशी बोलतील, एकमेकांना स्पर्श करतील, एकमेकांचा गंध घेतील; पण वेळ पूर्ण होईपर्यंत एकमेकांना पाहू शकणार नाहीत. पहिल्या डेटनंतर हे स्पर्धक एकमेकांना एकेकटे रोमँटिक डेटवर बोलावतील; पण, ही डेटसुद्धा अंधारातच असेल. शेवटच्या टप्प्यात सगळ्याचा उलगडा होत स्पर्धक एकमेकांना प्रत्यक्ष पाहत नाहीत तोवर या खेळात प्रचंड मजा असणार आहे. प्रत्येक एपिसोडच्या शेवटी स्पर्धक एकतर घराच्या बाल्कनीत त्यांच्या संभाव्य जोडीदाराला भेटतील किंवा सरळ समोरच्या दरवाज्यातून बाहेर पडतील.

नोरा फतेहीया शोच्या या प्रिमिअम एडिशनची सूत्रसंचालक म्हणून पदार्पण करताना नोरा फतेही म्हणाली, ‘एमटीव्ही डेटिंग इन द डार्क हा एक अनोखा शो आहे. यात प्रेक्षकांसाठी अतिशय नवे असे काही घडणार आहे. एखाद्याशी काही नाते तयार होत असताना अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर दिसणे खरेच महत्त्वाचे असते का, तसे असेल, तर किती प्रमाणात, तसे नसेल, तर मग काय महत्त्वाचे असते, असे अनेक प्रश्‍न अजून अनुत्तरित आहेत. या नव्या फॉरमॅटमुळे डेटिंगच्या ठरलेल्या साच्यापलीकडे पाहणे लोकांना शक्य होईल. कदाचित यातून काही नव्या संकल्पानाच तयार होतील. या शोचे सूत्रसंचालन करण्यास आणि प्रत्येक एपिसोडच्या शेवटी काय होते, हे पाहण्यास मी अगदी उत्सुक आहे.’

या संपूर्णत: नव्या फॉरमॅटमुळे प्रचंड अनिश्‍चितता असणार, हे निश्‍चित. हे सगळे सिंगल्स अंधारात आपल्या पहिल्या डेटला भेटत असताना प्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम फारच उत्सुकतापूर्ण ठरेल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link