Next
गृहवित्त कंपन्यांतील गुंतवणूक लाभदायी
BOI
Sunday, May 06, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this story

सध्या कंपन्यांचे तिमाही आणि वार्षिक आर्थिक निकाल जाहीर होत आहेत. बहुतांश आकडेवारी समाधानकारक असल्याने गुंतवणुकीसाठी चांगली संधी आहे. त्यातही गृहवित्त क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे लाभदायी ठरणार आहे. त्याविषयी सविस्तर माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ सदराच्या आजच्या भागात....
....
गेल्या शुक्रवारी निफ्टी व सेन्सेक्स अनुक्रमे १० हजार ६१९ व ३४ हजार ९१५वर बंद झाले. अनेक कंपन्यांचे मार्च २०१८ तिमाही व पूर्ण वर्षाचे विक्री व नक्त नफ्याचे आकडे प्रसिद्ध होत आहेत. ते उत्साहवर्धक असल्याने गुंतवणूकदार खूश आहेत. 

मागच्या आठवड्यात गुंतवणुकीसाठी म्हणून सांगितलेल्या ‘वेदान्त’ या अनिल आगरवाल यांच्या कंपनीचे या वर्षाचे उत्पन्न २७ हजार ६३० कोटी रुपये होते. नक्त नफा पाच हजार ६७५ कोटी रुपये होता. २०१७-१८ या पूर्ण वर्षाची विक्री ९२ हजार ९२३ कोटी रुपये होती. करोत्तर नफा १३ हजार ६९२ कोटी रुपये होता. कंपनीचा व्यवसाय दर्जा, चांदी, तांबे, अॅल्युमिनियम, जस्त अशा धातूंची असल्याने व सध्या सर्वच धातूंच्या किमती वर असल्याने, पुढील वर्षही कंपनीला चांगले जावे. अजूनही हा शेअर २८० ते २८५ रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. वर्षभरात तो २८ टक्के वाढून ३७५ रुपयांपर्यंत जावा. आपल्या भागभांडारापैकी १५ ते २० टक्के रक्कम इथे गुंतवायला हरकत नाही.

‘इंडियाबुल्स हाउसिंग’चे या तिमाहीचे उत्पन्न १७ हजार ५८ कोटी रुपये आहे. करोत्तर नफा ९५२ कोटी रुपये होता व शेअरगणिक उपार्जन २२ रुपये होते. २०१७-१८ या पूर्ण वर्षासाठी शेअरगणिक उपार्जन ८४ रुपये आहे. पुढील दोन वर्षांसाठी संभाव्य उपार्जन १०१ रुपये व १२२ रुपये व्हावे. गृहवित्त क्षेत्रात ही कंपनी पुढील पाच वर्षे उत्तम काम करेल. त्यामुळे दर वर्षी या शेअरचा भाव निदान २० टक्के व बहुधा २५ टक्के वाढत जावा. कंपनीने २०२३ पर्यंत उत्पन्नाचे लक्ष्य दहा हजार कोटी रुपये ठरवले आहे. दिवाण हाउसिंग फायनान्स, रेप्को होम फायनान्स व इंडियाबुल्स हाउसिंग या तिन्ही कंपन्यांत गुंतवणूक श्रेयस्कर ठरेल.

‘दिवाण हाउसिंग फायनान्स’चा मार्च २०१८ तिमाहीचा नफा ३१० कोटी रुपये आहे. मार्च २०१७च्या तिमाहीपेक्षा ती ८१ टक्के जास्त आहे. काही आठवड्यांपूर्वी ५५० रुपयांपर्यंत असलेला भाव आता ६८० रुपयांपर्यंत चढला आहे. वर्षभरात हा भाव ७८० रुपयांपर्यंत जावा. दोन वर्षांपूर्वी कंपनीने आपल्या विमा व्यवसायातील पोटकंपनीची विक्री केली होती. ती रक्कम भागधारकांना कधीतरी वाढता लाभांश व बक्षीस हक्कभाग स्वरूपात  मिळावी. हा शेअरही भागभांडारात जरूर हवा. ‘रेप्को होम्स’ही भागभांडारात ठेवायला हरकत नाही.

नॉनबँकिंग फायनान्स क्षेत्रातील मणप्पुरम फायनान्स व मुथुट फायनान्स या कंपन्यांचे आकडे प्रसिद्ध झाले, की ते शेअर्सही वाढतील. मणप्पुरम फायनान्सचा शेअर सध्या वाढून, १२८ रुपयांपर्यंत गेला आहे. त्याचे वर्षभरात लक्ष्य १६० रुपये आहे. जिंदाल स्टेनलेस (हिस्सार) या कंपनीचा शेअर सध्या १८५ रुपयांच्या आसपास आहे. जिंदाल समूहातील सर्वच कंपन्या गुंतवणुकीस उत्तम असल्या, तरी हा शेअर व जिंदाल स्टील अँड पॉवर या कंपन्यांतील गुंतवणूक जास्त नफा देऊन जाईल. जिंदाल स्टेनलेस (हिस्सार) वर्षभरात वा त्यापूर्वीही २८० रुपयांचा भाव सहज दाखवेल.


- डॉ. वसंत पटवर्धन
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Harsh About 287 Days ago
Very Useful article
0
0

Select Language
Share Link