Next
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे ‘ब्रह्मोद्योग’ महोत्सवाचे आयोजन
BOI
Monday, October 22, 2018 | 04:58 PM
15 0 0
Share this article:

‘ब्रह्मोद्योग-२०१८’बाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना गोविंद कुलकर्णी. या वेळी (डावीकडून) संदीप खर्डेकर, उदय महा, गोविंद कुलकर्णी व डॉ. जितेंद्र जोशी.

पुणे : ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे ‘ब्रह्मोद्योग-२०१८’ या राष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन होणार आहे’, अशी माहिती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, उद्योग आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र जोशी, प्रवक्ता संदीप खर्डेकर, प्रदेशाध्यक्ष उदय महा व जिल्हाध्यक्ष आनंद दवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी, २५ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता भोसलेनगर येथील अॅेग्रिकल्चर कॉलेजच्या मैदानावर केंद्रीय उद्योग मंत्री गिरीराज सिंग यांच्या हस्ते होणार आहे. शनिवारी, २७ ऑक्टोबर व रविवारी, २९ ऑक्टोबर या दोन दिवशी परिषद होणार असून, देशभरातील जवळपास एक हजार उद्योजक या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. २५ ऑक्टोबर रोजी मुख्य उद्घाटन सोहळ्यानंतर सकाळी अकरा वाजता  राज्यस्तरीय ब्राह्मण महिला मेळावा होणार असून, यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, अभिनेत्री मृणाल देव, आमदार मनिषा कायंदे, शोभाताई फडणवीस, सिम्बायोसिसच्या संचालिका डॉ. विद्या येरवडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर महिला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी चार वाजता वकिल आघाडीचा मेळावा होणार आहे. त्यासाठी निवृत्त न्यायाधीश व्यंकटेश्वरैय्या, अॅड. दादासाहेब बेंद्रे, अॅड. उदय वारुंजीकर यांच्यासह न्याय व विधी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असतील’, अशी माहितीही गोविंद कुलकर्णी यांनी दिली. 

‘२६ ऑक्टोबर रोजी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व इतर संलग्नित संस्थांच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन व ‘समाजभूषण’ पुरस्कारांचे वितरण होणार आहे. दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन शनिवारी, २७ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, माजी खासदार तरुण विजय, श्रीकांत भारतीय, आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, नीलम गोऱ्हे, अनंत गाडगीळ, माधुरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत. परिषदेचा समारोप रविवारी, २८ ऑक्टोबर रोजी  गोविंदगिरी महाराज आणि खासदार अमर साबळे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या वेळी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, माजी आमदार मोहन जोशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या वेळी उद्योजक अशोक देशपांडे यांना ‘उद्योगरत्न’ पुरस्कार, तर विद्या मुरकुणबी, संतोष पांडे, रमणाचार्य हैदराबाद, राध्येशाम जयमिनी, सुभाष तिवारी यांना ‘उद्योगभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या परिषदेमध्ये विविध चर्चासत्रे होणार असून,व्यवसायाच्या संधी, अर्थसहाय्य, व्यवस्थापन, व्यवसायातील आव्हाने आणि संधी, कर व्यवस्थापन अशा विविध विषयांवर तज्ज्ञ आपले विचार मांडणार आहेत. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते तीन या वेळेत राज्यस्तरीय ब्राह्मण एकत्रिकरण मेळावा होणार आहे. या वेळी ‘सन्मान, सहकार्य व संरक्षण’ या त्रिसूत्रीवर चर्चा होणार असून, यासाठी डॉ. गोविंद कुलकर्णी, वा. ना. उत्पात, गोवर्धनजी शर्मा, मोरेश्वर घैसास गुरुजी, अशोक बोडस यांच्यासह ब्राह्मण चळवळीतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत’, असेही या वेळी सांगण्यात आले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search