Next
पीएनजी ज्वेलर्सचे औंधमध्ये पहिले फ्रँचायजी स्टोअर
पुढील दोन वर्षात २० स्टोअर्स सुरू करण्याचे उद्दिष्ट
BOI
Friday, October 19 | 05:14 PM
15 0 0
Share this story

पीएनजी ज्वेलर्सच्या औंध येथील पहिल्या फ्रँचायजी स्टोअरचे उद्घाटन नुकतेच अभिनेत्री रवीना टंडन हिच्या हस्ते झाले. या वेळी पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ व अन्य मान्यवर.

पुणे : भारतातील सर्वांत विश्वसनीय ज्वेलरी ब्रँड असलेल्या पीएनजी ज्वेलर्सने फ्रँचायजी क्षेत्रामध्ये प्रवेश केला असून, त्यांनी आपले पहिले फ्रँचायजी स्टोअर औंध येथे सुरू केले आहे. याचे उद्घाटन दसऱ्याच्या मुहूर्तावर अभिनेत्री रवीना टंडन हिच्या हस्ते करण्यात आले. 

आयटीआय रोड औंध येथे हे स्टोअर असून, गेल्या काही वर्षांमध्ये औंध आणि बाणेर हे परिसर मोठ्या प्रमाणात विस्तारले आहेत. या परिसरात पीएनजी ज्वेलर्सचे स्टोअर असावे, अशी ग्राहकांची इच्छा होती. दोन हजार चौरस फूट जागेत हे स्टोअर असून, येथे सोने, चांदी व हिऱ्यांच्या दागिन्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध असेल.

या स्टोअरचे स्वरूप पीएनजी ज्वेलर्सच्या इतर स्टोअर्सप्रमाणेच असून, ब्रँडची उच्च गुणवत्ता व मानकांचा वारसा पुढे नेईल. प्रत्येक फ्रँचायजी स्टोअरमध्ये पीएनजी ज्वेलर्सतर्फे एक व्यवस्थापक असणार आहे. ज्यामुळे गुणवत्तेचे प्रमाण व या जागतिक ब्रँडचा नावलौकिक जपण्यासाठी आवश्यक त्या पध्दतीने कामकाज केले जाईल. 

या वेळी बोलताना पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले, ‘फ्रँचायजी बिझनेसच्या घोषणेनंतर आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाल. मला खूप आनंद होत आहे की, पीएनजीच्या फ्रँचायजी मॉडेलसाठी आम्ही जे कष्ट घेतले आहेत ते आता वास्तवात उतरत आहेत. पुणे ही आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे म्हणूनच फ्रँचायजी दालनांचा प्रवास पुण्यापासून सुरू होत आहे. येत्या वर्षांमध्ये आम्ही अधिक मोठ्या प्रमाणावर विस्तारीकरण करू अशी आम्हाला आशा आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link