Next
पुण्यात ५१ फुटी शिवस्वराज्यगुढी
BOI
Wednesday, June 06, 2018 | 06:01 PM
15 0 0
Share this story

पुणे : ३४५व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून सहा जून २०१८ रोजी पुण्यात शनिवारवाड्याच्या प्रांगणात ५१ फुटी शिवस्वराज्यगुढी उभारण्यात आली. शिवजयंती महोत्सव समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात शिवज्योतींनी शिवरायांची महाआरतीही करण्यात आली. या वेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, धर्मराज हांडे महाराज, समितीचे संस्थापक अध्यक्ष व स्वराज्यगुढीचे संकल्पक अमित गायकवाड यांच्यासह पुणेकर नागरिक उपस्थित होते. 

शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यातील सर्व स्वराज्य घराण्यांच्या प्रतिनिधींच्या हस्ते श्री शिवछत्रपतींचा जिरेटोप, शिवमुद्रा, सुवर्णहोन, वाघनखे आणि जगदंब तलवार या पाच शुभचिन्हांनी अलंकृत अशा भगव्या स्वराज्यध्वजासह ही स्वराज्यगुढी दिमाखात उभारण्यात आली. ‘फर्जंद’ सिनेमातील कलाकारदेखील या वेळी उपस्थित होते.

‘शिवराज्याभिषेक दिनाचे अनन्यसाधारण महत्त्व देशवासीयांना समजावे, याकरिता सहा जून हा दिवस महाराष्ट्र शासनाने स्वराज्यदिन म्हणून जाहीर करावा,’ अशी मागणी आयोजक अमित गायकवाड यांनी केली. ‘या मागणीचा पाठपुरावा करू,’ असे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिले.

(या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link