Next
हिमायतनगरला विकासाचे मॉडेल करणार
नगराध्यक्ष कुणाल राठोड यांची ग्वाही
नागेश शिंदे
Friday, March 29, 2019 | 02:53 PM
15 0 0
Share this article:

हिमायतनगर : ‘गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक प्रभाग विकासापासून वंचित राहिले. रस्त्यासह वीज-पाण्याची व्यवस्थादेखील उपलब्ध नव्हत्या. परंतु माझ्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात मी प्रत्येक प्रभागातील नागरिकांना सोई-सुविधा देऊन त्यांचे प्रश्न सोडविणार आहे. शहरातील कामे दर्जेदार होण्यासाठी नागरिकांनीही नगर पंचायतीला सहकार्य करावे,’ असे आवाहन नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी केले आहे.

‘नगर पंचायतीमध्ये गेल्या सहा महिन्यांच्या कार्यकाळात वीस कोटी रुपयांहून अधिक निधीची कामे शहरात झाली. यात प्रभागातील रस्त्यांसह पाण्याची समस्या मार्गी लावण्यात यश आले. सध्या शहरात बारा कोटींच्या रस्त्याची कामे सुरू आहेत,’ असे नगराध्यक्ष कुणाल राठोड म्हणाले.

‘शहरातील प्रत्येक प्रभागात विविध कामांसाठी निधी प्राप्त झाला आहे. येणाऱ्या काळात पाणीपुरवठ्यासह विकासकामे करून शहराला विकासाचे मॉडेल करणे, हाच माझा उद्देश आहे,’ असे राठोड म्हणाले. या वेळी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद अ. गणी, नगरसेवक अन्वरखान पठाण, रामभाऊ ठाकरे, प्रभाकर मुधोळकर, सदाशिव सातव, सरदार खान, खयुम भाई, विनायक मेडंके, सावन डाके उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Nilkanth About 88 Days ago
Chan pan ward 12 madhe pani chi suvidhdha Havi
0
0

Select Language
Share Link
 
Search