Next
‘मॅक्स बुपा’तर्फे आरोग्य विमा योजना
प्रेस रिलीज
Tuesday, February 20 | 02:47 PM
15 0 0
Share this story

पुणे : भारतातील आघाडीच्या स्वतंत्र आरोग्य विमा कंपन्यांपैकी असलेल्या ‘मॅक्स बुपा’ने डिजिटल सक्षम दैनंदिन वापराची ‘मॅक्स बुपा गोअॅनअॅक्टिव्ह हेल्थ इन्शुरन्स प्लॅन’ ही आरोग्य विमा योजना सादर केली आहे. ही नव्या युगातील योजना क्रांतिकारी व ग्राहक केंद्रित असून, ती भारतीयांच्या दैनंदिन आरोग्य गरजांची पूर्तता करणारी आहे. आरोग्य विमा उद्योगात परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने या योजनेची रचना करण्यात आली आहे.
 
‘गोअॅनअॅक्टिव्ह’ ही कल्याणकारी आरोग्य योजना असून, रुग्णालयात दाखल करणे, ओपीडीमध्ये तपासणी, निदान, वैयक्तिक आरोग्य मार्गदर्शन, दुसऱ्या डॉक्टरांचे मत, वर्तनात्मक सल्ला अशा दैनंदिन आरोग्य गरजांसाठी ग्राहकांना चतुरस्त्र संरक्षण देण्याच्या हेतूने तिची रचना करण्यात आली आहे. ग्राहकांना या सर्व सेवा अखंडित देईल, अशी डिजिटल सक्षम स्वास्थ्य परिसंस्था निर्माण करण्यासाठी ‘मॅक्स बुपा’ने गोक्वि, प्रॅक्टो व १एमजी अशा प्रमुख आरोग्य-तंत्रज्ञान पुरवठादारांनाही एकाच व्यासपीठावर आणले आहे.
 
या योजनेचे प्रमुख फायदे स्पष्ट करताना ‘मॅक्स बुपा’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष मेहरोत्रा म्हणाले, ‘दर पाचांपैकी एक भारतीय जीवनशैली रोगांनीग्रस्त असताना आरोग्य विमा हा आता पर्याय राहिलेला नसून ती गरज ठरली आहे. भारतातील ६० टक्क्यांहून अधिक आरोग्यसुरक्षा खर्च आजही आकस्मिक असतो आणि ग्राहकांना त्यासाठी स्वतःच तरतूद करावी लागते. ‘गोअॅनअॅक्टिव्ह हेल्थ इन्शुरन्स प्लॅन’द्वारे ही पोकळी भरून काढत अधिकाधिक लोकांना आरोग्य विम्याच्या परिघात आणण्याचे आमचे उद्दिष्ट्य आहे.’

ते पुढे म्हणाले की, ‘दैनंदिन तत्त्वावर वापरता येईल आणि हॉस्पिटलायझेशनपलिकडे साह्य करेल, अशी एक कल्याणकारी आरोग्य विमा योजना तयार करण्यासाठी आम्ही गोक्वि, प्रॅक्टो व १एमजी यांसारख्या अनेक तज्ज्ञांशी सहयोग केला आहे. गोअॅनअॅक्टिव्ह ही भारताची दैनंदिन आरोग्य विमा योजना आहे, जी ओपीडी, निदान, आरोग्य तपासण्या, स्वास्थ्य, वर्तनात्मक साह्य, गंभीर आजार स्थिती दुसऱ्या डॉक्टरांचे मत अशा अनेक गोष्टींच्या खर्चांपासून संरक्षण देते.’
 
‘मॅक्स बुपा गोअॅनअॅक्टिव्ह हेल्थ इन्शुरन्स प्लॅन’ ग्राहकांना अगदी पहिल्या दिवसापासून बचतीचा फायदा मिळवून देते. ज्यामध्ये प्रत्येक प्रौढ व्यक्तीमागे दोन हजार ५०० रुपये किंमतीची संपूर्ण शरीराची मोफत आरोग्य तपासणी, तसेच कॅशलेस/रीइम्बर्समेंट ओपीडी कव्हरेज ग्राहकांना दिले जाते. ग्राहकांनी त्यांचे आरोग्य उद्दिष्ट्य गाठल्यास पुनर्नवीकरण हप्त्यांमध्ये २० टक्क्यांपर्यंत सवलतही दिली जाते. याखेरीज या योजनेत ‘अॅडव्हान्टेज’ हा लाभही समाविष्ट आहे, ज्यानुसार विम्यासाठी नोंदणी केलेल्या सर्वाधिक ज्येष्ठ व्यक्तीचे वय ३५ वर्षांखाली असेल, तर पॉलिसी खरेदीच्या वेळी आणि भविष्यातील सर्व पुनर्नवीकरणाच्या वेळी मूळ हप्त्यावर १० टक्के सवलत दिली जाते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link