Next
पटवर्धन संगीत अकादमीची १५३वी संगीत मैफल
BOI
Friday, October 26 | 04:09 PM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी संचलित (कै.) यशवंतराव पटवर्धन संगीत अकादमीची १५३वी संगीत मैफल मेवाती घराण्याचे गायक हेमांग मेहता रंगवणार आहेत. ही मैफल २७ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता गोदूताई जांभेकर विद्यालयाच्या कीर सभागृहात होईल.

मेहता यांचे संगीत शिक्षण पंडित चंद्रशेखर स्वामी यांच्याकडे झाले आहे; तसेच पंडित जसराज यांचे सांगीतिक मार्गदर्शन लाभले आहे. मैफलीला प्रथमेश रहाणे तबलासाथ, तर महेश दामले संवादिनीसाथ करणार आहेत. या कार्यक्रमाला रत्नागिरी रिफायनरी अ‍ॅंड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडचे सहप्रायोजकत्व मिळाले आहे. मैफलीचा जास्तीत जास्त रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन अकादमीच्या अध्यक्षा डॉ. कल्पना मेहता आणि मानद संचालक डॉ. रवींद्र घांगुर्डे यांनी केले आहे.

मैफलीविषयी :
दिवस :
शनिवार, २७ ऑक्टोबर २०१८
वेळ : सायंकाळी ६.३० वाजता
स्थळ : कीर सभागृह, गोदूताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link