Next
‘मुळशी पॅटर्न’च्या कलाकारांचे अनोखे शस्त्रपूजन
शेतकऱ्यांसह केले शेतीच्या अवजारांचे पूजन
BOI
Friday, October 19 | 12:24 PM
15 0 0
Share this story

पुणे :  लेखक, अभिनेता प्रविण विठ्ठल तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाच्या कलाकारांनी  खंडेनवमी आणि दसऱ्यानिमित्त अनोखे शस्त्रपूजन केले. शेतकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी शेतीच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध अवजारांचे पूजन केले. अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांची निर्मिती असलेला बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा आहे. हा चित्रपट दिवाळीनंतर येत्या २३ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

भारतीय संस्कृती मधील प्रत्येक सण, उत्सव हा शेती आणि शेतकऱ्याशी निगडीत आहे. दसऱ्याचीदेखील एक कृषिविषयक लोकोत्सव म्हणून परंपरा आहे. यामुळे दसऱ्याच्या निमित्त शेतीच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या नांगर, कूदळ, फावडा, विळा, खुरपी या अवजारांचे पूजन करण्यात आले. या वेळी नांदेड गावचे सरपंच गुरुदत्त कारले, शेतकरी अरविंद लगड, निर्माते अभिजित भोसले, प्रस्तुतकर्ते किरण दगडे पाटील, दिग्दर्शक प्रविण तरडे, अभिनेत्री मालविका गायकवाड, अभिनेते रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड सुनील अभ्यंकर, अमोल धावडे, जयेश संघवी, कार्यकारी निर्माते विशाल चांदणे आदी उपस्थित होते.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link