Next
वीस हजार मुले करणार गरिबीतून बाहेर येण्याचा प्रवास
‘मॅजिक बस’ने गरीब मुले आणि तरुणांसाठी उभारला निधी
प्रेस रिलीज
Monday, October 29, 2018 | 01:19 PM
15 0 0
Share this article:

‘दी बेनिफिट’ या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर.

मुंबई : गेल्या दोन दशकांपासून भारतातील गरिबी निर्मूलनासाठी काम करत असलेल्या सातव्या मॅजिक बस बेनिफिटतर्फे भारतातील २० हजार गरीब मुलांसाठी आणि तरुणांसाठी निधी उभारण्यात आला. या माध्यमातून आतापर्यंत साडेतीन लाखांहून अधिक मुले गरिबीतून बाहेर येण्याच्या प्रवाहात सामील झाली असून, आता अजून २० हजार मुले त्यांच्या या प्रवासाची सुरुवात करणार आहेत.

मुंबईतील सेंट रेगिस येथे झालेल्या या कार्यक्रमाला कल्की कोचलीन, दिया मिर्झा, अनिता श्रॉफ अडजानिया, दिनो मोरिया आणि मंदिरा बेदी यांसारखे कलाकार उपस्थित होते. या वेळी ‘द व्हॅम्प्स’ या ब्रिटीश पॉप रॉक बँडचे सादरीकरण झाले. गरिबीत राहणाऱ्या मुलांचा बालपण ते उदरनिर्वाहाचे साधन मिळविण्याचा (चाइल्डहूड टू लाइव्हलीहूड) प्रवास सुखकर व्हावा यासाठी निधी गोळा करणे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. यासाठी ‘दी बेनिफिट’ या कार्यक्रमात निवडक उच्चभ्रू आणि समाजातील नामवंत व्यक्ती एका नियोजित संध्याकाळी एकत्र येतात.

‘मॅजिक बस’ने ‘सोना बीएलडब्ल्यू’, ‘ओएजीएन’ आणि ‘हेलो’ या ब्रँड्ससोबत भागीदारी केली. या उद्दिष्टासाठी निधी उभारण्यासाठी ‘मॅजिक बस’ला मदत करण्यासाठी जगातील अनेक लक्झरी ब्रँड्सने योगदान दिले आहे. यात ‘अमन-इ-खास’, ‘अरमानी’, ‘जेए दी रिसॉर्ट’, मनीष मल्होत्रा, पलाझो व्हर्साचे दुबई, ‘सॉथेबीज’ आणि ‘दी सेंट रेगिस मालदिव्ह्ज व्हॉम्युली रिसॉर्ट’ यांचा समावेश आहे.
 
‘मॅजिक बस’ हा भारतातील सर्वात मोठ्या गरीबी निर्मूलन कार्यक्रमांपैकी एक असून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून २०१७-१८ या आर्थिक वर्षात २२ राज्ये आणि ७७ जिल्ह्यांमधील तीन लाख ७५ हजार मुलांवर सकारात्मक परिणाम करण्यात आला आहे. ७९८ हून अधिक शाळांमध्ये क्रीडा उपक्रमांवर आधारित सत्रे घेण्यात आली. मुले आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण करून योग्य वयात लग्न करतील, त्यांना व्यवस्थित रोजगार मिळेल आणि ते स्वावलंबी व सामाजिकदृष्ट्या सबल होतील, याची खातरजमा ‘मॅजिक बस’च्या ‘चाइल्डहूड टू लाइव्हलीहूड’ या उपक्रमांतर्गत केली जाते.

दिनो मोरियाया उपक्रमासाठी सातत्याने सहकार्य करणाऱ्या दात्यांचे आभार मानत ‘मॅजिक बस’चे संस्थापक मॅथ्यू स्पेसी म्हणाले, ‘आम्ही १९ वर्षांपूर्वी सुरुवात केली तेव्हा आमच्या कार्यक्रमात ३० मुलांचा सहभाग होता; पण आज आमच्या आश्रयदात्यांच्या सहकार्यामुळे आम्ही भारतातील तीन लाख ७५ हजार मुलांच्या आणि तरुणांच्या आयुष्यावर परिणाम करू शकलो आहोत. आम्हाला मिळालेल्या सहकार्यामुळे आजपासून अजून २० हजार मुले गरिबीतून बाहेर येण्यासाठीच्या त्यांच्या प्रवासाची सुरुवात करतील. ‘मॅजिक बस’ला मिळालेल्या या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल आम्ही अत्यंत कृतज्ञ आहोत. या पाठिंब्यामुळे भारतातील प्रत्येक मुलाला स्वावलंबी व देशाचा सक्षम नागरिक करण्याचे आमचे अशक्यप्राय ध्येय आता वास्तवात येऊ शकेल. त्यामुळे तुमचे सहकार्य अमूल्य आहे.’
 
गरिबी निर्मूलनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित करताना ‘मॅजिक बस’चे सीईओ जयंत रस्तोगी म्हणाले, ‘आम्ही ज्यांच्यासाठी काम करतो ती मुले वंचित समाजातील असतात. या सामाजिक गटात शाळेतील अनियमित उपस्थिती, बालविवाह, बालकामगार ही या मुलांसमोरील आव्हाने आहेत. त्यामुळे या मुलांची परिस्थिती अत्यंत बिकट होत जाते. सातत्याने हस्तक्षेप करत आम्ही त्यांना माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्याच्या दृष्टीने सक्षम करतो, त्यांचे लग्न बालवयात होऊ देत नाही आणि त्यांना रोजगार मिळवून देतो. परिणामी ही मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतात आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम होतात.’

‘आमच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी ९९ टक्के मुले नियमितपणे शाळेत जातात आणि ९५ टक्के मुली वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न करत नाहीत, असे आम्हाला दिसून आले आहे. ही आकडेवारी उल्लेखनीय आहे आणि आज आम्हाला जो पाठींबा मिळाला आहे, त्याने अजून काही मुलांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होणार आहे,’ असे रस्तोगी यांनी नमूद केले.

सुनैना मूर्ती, स्मिती कनोडिया, अधुना भाबानी, माला श्रीवास्तव, समंथा नायर आणि सुपर्ना मोटवाने यांच्या समितीमुळे मुंबईतील वार्षिक मॅजिक बस बेनिफिट कार्यक्रमासाठी सेलिब्रिटी आणि टॉप ब्रँड्सचे सहकार्य मिळाले.

कल्की कोचलिनया कार्यक्रमाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना ‘मॅजिक बस’च्या को-चेअर सुनैना मूर्ती म्हणाल्या, ‘गेल्या सात वर्षांपासून देणगीदार आणि अग्रणी ब्रँड्सच्या दातृत्वामुळे आणि खंबीर पाठिंब्यामुळे मॅजिक बसला भारतातील गरिबीत राहणाऱ्या मुलांच्या व तरुणांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्यास खूप मदत झाली आहे.’

अभिनेत्री कल्की कोचलिनने म्हणाली, ‘आपण आज आपल्या मुलांची काळजी घेतली नाही, तर भविष्यात आपला समाज परिपक्व होऊ शकत नाही. आज आपण त्यांना जे शिक्षण देऊ त्याचा परिणाम समाजाच्या जडणघडणीवर होणार आहे आणि फरक एक किंवा दोन दशकांनंतर दिसून येईल. आपल्या मुलांच्या सक्षमीकरणासाठी आपण अधिक लक्ष दिले पाहिजे.’  
 
दिया मिर्झामॅजिक बसची दाती दिया मिर्झा हिने मुलांना जीवनावश्यक कौशल्ये प्रदान करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ती म्हणाली, ‘मी अलीकडेच मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे मॅजिक बसच्या क्रीडा उपक्रमांवर आधारित सत्रासाठी उपस्थित राहिले होते आणि आयुष्यातील शिकवण या सुरक्षित व खेळकर वातावणात कशा प्रकारे दिली जात होती, हे पाहून मी अत्यंत प्रभावित झाले. या ठिकाणी त्यांना कठीण परिस्थितीवर मात करणे, आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा किंवा सोप्या शब्दांत सांगायचे झाले, तर शाळेत आणि कामावर नियमित जाण्याचे महत्त्व शिकविण्यात येते. ‘मॅजिक बस’ या मुलांना मदत करत आहेच, त्याचप्रमाणे एक नवी पिढी तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे.’
 
बॉटमलाइन मीडियाच्या व्यवस्थापकीय संचालक तनाझ भाटिया म्हणाल्या, ‘मुलांना गरिबीतून बाहेर काढणे हे आपल्या देशाचा विचार करता एक असामान्य मिशन आहे. असे म्हणतात की, संगीतात एक प्रकारची जादू असते. इग्लंडमधील ‘द व्हॅम्प्स’ हा लोकप्रिय ब्रँडच्या कॉन्सर्टचे आम्ही येथे आयोजन करू शकलो, याबद्दल आम्ही अत्यंत आनंदी आहोत. त्यांच्या संगीताच्या माध्यमातून कित्येक वंचित मुलांच्या आयुष्याला दिलासा देणारा स्पर्श केला जाणार आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search