Next
‘डिस्कव्हरी स्कूल सुपर लीग’ला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
पुण्यातील एक लाख २० हजार विद्यार्थ्यांचा समावेश
प्रेस रिलीज
Thursday, September 27, 2018 | 11:41 AM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘डिस्कव्हरी स्कूल सुपर लीग’ या राष्ट्रीयस्तरावरील आंतरशालेय स्पर्धेमध्ये पुण्यातील दोनशे शाळांमधील एक लाख २० हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. देशभरातील १२ हजारांहून अधिक शाळांमधील आठ ते १४ या वयोगटातील २५ लाख विद्यार्थी सहभागी होणारी ही आजवरची सर्वात मोठी स्पर्धा ‘बायजूज’ कंपनीने प्रायोजित केली आहे.  

एसपीजी इंटरनॅशनल स्कूल, नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल, साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल, एचडीएफसी स्कूल, लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूल, दी बिशप्स को-एड स्कूल, जी जी इंटरनॅशनल स्कूल, बीकन हायस्कूल या पुण्यातील शाळा या ‘क्विझ शो’मध्ये भाग घेण्याची शक्यता आहे. काटेकोर चाचणी झाल्यावर प्रत्येक राज्यातील पहिला क्रमांक मिळवलेले विद्यार्थ्यांचे पथक टिव्ही क्विझ शोसाठी पात्र ठरेल. डिस्कव्हरी आणि डिस्कव्हरी किड्स या वाहिन्यांवर हे सहा भागांचे क्विझ फेब्रुवारी २०१९पासून दाखविण्यात येईल. ‘डिस्कव्हरी स्कूल सुपर लीग’च्या अंतिम स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्या पथकाला ‘नासा’ या संस्थेच्या भेटीचे बक्षिस देण्यात येईल.

या संदर्भात ‘बायजूज’चे मुख्य कार्यान्वय अधिकारी मृणाल मोहित म्हणाले, ‘डिस्कव्हरी स्कूल सुपर लीग पॉवर्ड बाय बायजूज या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद पाहून आम्ही खूप उत्साहीत आहोत. उजाडणाऱ्या प्रत्येक दिवशी हा क्विझ शो मोठा होत चालला आहे. पुण्यात सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही शुभेच्छा देतो.’

‘डिस्कव्हरी कम्युनिकेशन्स इंडिया’चे उपाध्यक्ष, जाहिरात विक्री विभागाचे प्रमुख आणि क्षेत्रीय व्यवसाय प्रमुख विक्रम तन्ना याप्रसंगी म्हणाले, ‘बायजूजशी भागीदारी करण्याने आणि शिक्षण व ज्ञान या दोन क्षेत्रांशी संबंधित उपक्रमात सामील होण्याने आम्हाला समाधान मिळत आहे. ‘डिस्कव्हरी स्कूल सुपर लीग पॉवर्ड बाय बायजूज’ हा कार्यक्रम अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमधील सर्वोत्कृष्ट ठरावा, असे आमचे उद्दिष्ट आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search