Next
‘टाटा मोटर्स’तर्फे ‘विंगर १५ सीटर’ महाराष्ट्रात सादर
प्रेस रिलीज
Saturday, July 28, 2018 | 05:25 PM
15 0 0
Share this story

मुंबई : टाटा मोटर्सतर्फे ‘विंगर १५ सीटर’ ही मोनोकॉक बस नुकतीच महाराष्ट्रात सादर करण्यात आली. प्रवाशांना सर्वोत्तम आराम मिळवून देतानाच वाहनचालकाला पैशांचे सर्वाधिक दीर्घकाळ मूल्य मिळवून देण्याच्या उद्देशाने या १५ आसनी वाहनाची निर्मिती करण्यात आलेली आहे. १२.०५ लाख रुपये किंमतीला सुरू होणारी ‘विंगर १५एस’ ही महाराष्ट्रातील २३ वितरक आणि टाटा मोटर्सच्या दालनांमधून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या वाहनात आरामदायी पुश बॅक आसने, वैयक्तिक एसी झडपा, आसनांच्या प्रत्येक रांगेमध्ये युएसबी चार्जिंग पॉईंटस आदी सुविधा असल्याने जवळचा तसेच लांब पल्ल्याचा दोन्ही प्रवास सोयीचा होतो. त्याचबरोबर विंगरच्या मोनोकॉक प्रकारच्या बांधणीमुळे आवाजाची, कंपनांची आणि धक्क्यांची तीव्रता पातळी (एनव्हीएच) अतिशय अल्प राखण्यात यश आलेले आहे. पुढील बाजूस अँटी रोल बार्स आणि हायड्रोलिक शॉक अॅब्सोर्बर्सची जोड असलेले स्वतंत्र सस्पेन्शन बसविण्यात आल्याने सुरळीत आणि गचके न बसणाऱ्या सफरीचा आनंद लुटता येतो.

या निमित्ताने बोलताना टाटा मोटर्सच्या प्रवासी व्यापारी वाहन व्यवसाय विभागाचे विक्री आणि विपणन प्रमुख संदीप कुमार म्हणाले, ‘झपाट्याने नागरीकरण होत असलेल्या तसेच वाहतुकीची कोंडी आणि पर्यावरणविषयक मुद्दे हे चिंतेचे विषय असलेल्या आपल्या देशात ‘टाटा विंगर १५एस’ हे परिमाणे बदलून टाकणारे वाहन ठरेल. उत्पादनाची कामगिरी आणि इंधन कार्यक्षमता या प्रवास आणि पर्यटन व्यवसाय चालकांच्या सध्याच्या महत्त्वाच्या गरजा यथायोग्यपणे भागविणारे हे वाहन आहे. प्रवाशांना सर्वाधिक आराम आणि व्यवसाय चालकांना सर्वाधिक आर्थिक मूल्य असे अनोखे फायद्याचे मिश्रण मिळवून देण्याच्या दृष्टीने ‘टाटा विंगर १५एस निर्माण करण्यात आलेली आहे.’

‘प्रवास आणि पर्यटन क्षेत्राच्या अनुषंगाने विकसित करण्यात आलेली ‘टाटा विंगर १५एस’ दिमाख, मुबलक जागा, आरामदायीपणा आणि सुरक्षितता हे सारे काही पुरविणारी आहे. या वाहनाला तीन वर्षे किंवा तीन लाख किलोमीटर (जे आधी पूर्ण होईल ते) अशी विस्तारित वॉरंटी बहाल करण्यात आलेली आहे. ज्यामुळे हे या श्रेणीतील सर्वाधिक विश्वासार्ह आणि भरवशाचे वाहन बनले आहे. महाराष्ट्रात मोठी कुटुंबे, व्यावसायिक आणि शटल चालक यांच्यात आमचे हे उत्पादन प्रचंड लोकप्रियता मिळवेल याची आम्हाला खात्री आहे,’ असा विश्वास कुमार यांनी व्यक्त केला.

सर्वाधिक कामगिरी आणि इंधनक्षमतेसाठी ‘विंगर १५एस’ला टाटा मोटर्सचे २.२ लिटर डायकॉर इंजिन बसविण्यात आले आहे. यात ०० एचपीची शक्ती आणि १९०एमचा फ्लॅट टॉर्क मिळतो. परिणामी अगदी कमी आरपीएमलाही सर्वाधिक वेग शक्ती मिळू शकते. या वाहनात अधिक सुरळीत चलनवलन तसेच अधिक आरामदायी सफर यांच्यादृष्टीने एक स्वतंत्र एमसी फर्सन स्ट्रट सस्पेन्शन यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. ‘टाटा विंगर १५एस’मध्ये फ्रंट अॅक्सल ड्राइव्हचा समावेश असल्याने ती या श्रेणीतील सर्वाधिक कमी एनव्हीएच (ध्वनी निर्माण करणारी कंपन तीव्रता) असलेले वाहन बनली आहे. फ्रंट अॅक्सल ड्राइव्हमुळे हलके वजन, अधिक चांगली खेचून नेण्याची शक्ती आणि कमी झालेले उत्सर्जन असे विविध लाभ मिळू शकणार आहेत.

‘टाटा विंगर १५एस’ ही ५४५८ एमएम लांब असून, तिला मोठे १५ इंच टायर व्हील कॅपसह बसविण्यात आले आहेत. ज्यामुळे ग्राउंड क्लिअरन्स वाढून १८०० एमएम झाला आहे. १९००एमएम/६.३” एवढ्या अंतर्गत उंचीमुळे हे वाहन प्रवाशांना अतिशय सुकरतेने हालचाल करण्याची मुभा पुरवते. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ‘विंगर १५एस’मध्ये सामान ठेवण्यासाठी ६०० लीटर एवढी मुबलक जागा देण्यात आलेली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link