Next
‘ब्ल्यू स्टार’कडून एसीची नवीन शंभर मॉडेल्स सादर
प्रेस रिलीज
Thursday, March 22, 2018 | 02:47 PM
15 0 0
Share this story

ब्ल्युस्टारच्या नवीन एसी मॉडेल्सच्या सादरीकरणाची  घोषणा करताना सी. पी. मुकूंदन मेनन  व मनोज शर्मा.

पुणे : ‘ब्ल्यूस्टार लिमिटेड’ने एअर कंडिशनरची शंभर  नवीन मॉडेल्स दाखल केली असून  अत्यंत उर्जा कार्यक्षम अशा  चाळीस  इनव्हर्टर एअर कंडिशनरर्सचा त्यात  समावेश आहे,’ अशी माहिती कंपनीच्या सेल्स अँड मार्केटिंग, प्रॉडक्ट बिझनेस विभागाचे प्रेसिडेंट सी. पी. मुकूंदन मेनन यांनी पुण्यात दिली. या वेळी सरव्यवस्थापक मनोज शर्मा उपस्थित होते.

मेनन पुढे म्हणाले, ‘एअर कंडीशनिंग आणि व्यावसायिक रेफ्रिजरेशनरमधील आघाडीवर असलेल्या  या कंपनीने उच्च ऊर्जा-कार्यक्षम थ्री स्टार आणि फ़ाईव्ह-स्टार इनव्हर्टर स्प्लिट एअर कंडिशनर्सची  चाळीस नवीन मॉडेल्स आणली आहेत. ही श्रेणी तीस टक्के  अतिरिक्त शीतकरणाची आणि अतिरिक्त ऊर्जा बचतीची हमी देते. तंतोतंत तापमान सेटिंग,  तसेच कॉम्प्रेसरसाठी एक साऊंडप्रुफ जॅकेट , आरोग्यदायी हवेसाठी  शुध्दीकरण तंत्रज्ञान  ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. ब्ल्यू स्टारकडील इन्व्हर्टर स्प्लिट एअर कंडिशनर्सची स्टेट ऑफ आर्ट असलेली स्मार्ट रेंज बीईई ऊर्जा कार्यक्षमता निकषांची  पूर्तता करणारी आहे.’ 

‘ब्ल्यूस्टार आता ७५ व्या वर्षात पदार्पण करणार असून कंपनीने २०११ मध्ये निवासी एअरकंडिशनरच्या क्षेत्रात प्रवेश केला होता. तेव्हांपासून विक्री वेगाने वाढत आहे. सध्या कंपनीचा  बाजारपेठेतील  हिस्सा साडे अकरा टक्के  आहे. उच्च ऊर्जा-कार्यक्षम इन्व्हर्टर स्प्लिट एसीचे नवीन मापदंड कंपनीने आपल्या नव्या लाईन-अप एअर कंडिशनर्समधून प्रस्थापित  केले आहेत. त्यात शंभरपेक्षा जास्त मॉडेल्स आहेत. अतिटोकाचे हवामान असणार्या् शहरांसाठी थ्री स्टार आणि फ़ाईव्हस्टार इन्व्हर्टर स्प्लिट एसी तसेच हॉट व कूल इनव्हर्टरसह इन्व्हर्टर स्प्लिट एसीची संपूर्ण श्रेणी आहे.पाच स्टार इन्व्हर्टर स्प्लिट एसी रेंजमधील तीन  मॉडेल्स स्मार्ट वाय फाय तंत्रज्ञानाने युक्त असल्याने रिमोटद्वारे एअरकंडिशनर हव्या त्या पध्दतीने चालविता येतो. कंपनीने एअर कूलर्स आणि एअर प्युरिफायर्सही बाजारपेठेत आणले आहेत. कंपनीने विकसित केलेले नवीन ग्राहक केंद्री मोबाईल अॅलपही वैशिष्ट्यपूर्ण असून, तुम्ही त्याद्वारे तुमचे एसी प्रोफाईल व्यक्तिगत गरजांनुसार बनवू शकता. उत्तम नियंत्रणासाठी एसीची वर्गवारी करू शकता. सेटिंगचा जास्तीत जास्त चांगला वापर करू शकता. ‘होम ऑटोमेशन सिस्टीम’शी हे अॅप जोडू शकता. संशोधन व विकासाला चालना देण्यासाठी तसेच नवीन उत्पादन विकासासाठी  २०१८ मध्ये कंपनी ३३कोटी रूपये खर्च करणार आहे. २०१९ मध्ये ही रक्कम वाढवून ती चाळीस कोटीवर नेण्याचा विचार आहे,’ असेही सी. पी. मुकुंदन मेनन यांनी सांगितले.

‘देशात जानेवारी ते डिसेंबर २०१७ या कालावधीत रूम  एसीची बाजारपेठ दहा  टक्क्यांनी वाढली. याच कालावधीत ब्लू स्टारने मात्र जवळपास १५ टक्के  वाढ नोंदवली आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे  एसीची  मागणी वाढणार आहे. अर्थिक  वर्ष २०१९ मध्ये कंपनीला १२.५ टक्के  बाजारपेठीय हिस्सा अपेक्षित आहे,’असेही मेनन यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link