Next
‘केंट आरओ’तर्फे चार वर्षे मोफत देखभाल सेवेची घोषणा
प्रेस रिलीज
Wednesday, June 13, 2018 | 01:52 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : भारतातील सर्वधिक विश्वसनीय जलशुद्धीकरण (वॉटर प्युरीफायर) ब्रँड असलेल्या ‘केंट आरओ’ने आपल्या ग्राहकसेवेला आणि मालकी अनुभूतीला आणखी समृद्ध करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. ‘केंट आरओ’ आता चार वर्षांच्या विस्तारित (एक वर्ष वॉरंटी आणि तीन वर्षांची मोफत सेवा) निःशुल्क देखभाल सेवेसह उपलब्ध होणार आहे.

बाजारात स्थानिक देखभाल सेवा पुरवणाऱ्या लोकांनी सुचविलेले हलक्या दर्जाचे सुटे भाग आणि निम्न दर्जाची देखभाल सेवा यामुळे आपल्या ग्राहकांना मनस्ताप होऊ नये, या हेतूने ‘केंट आरओ’ने हे पाऊल उचलले आहे.

विश्वासार्ह देखभाल सेवेची गरज विशद करताना केंट आरओ सिस्टिम्स लिमिटेडचे अध्यक्ष महेश गुप्ता म्हणाले, ‘बहुतांश वेळा ग्राहकांना आपल्या उत्पादनाची नियमित, तसेच दर्जेदार देखभाल आणि सेवा यांच्यामागील गरज आणि व्यवहार्यता समजत नाही. तुमच्या उत्पादनातील फिल्टर व्यवस्थित सुरू असला, तरच तुम्हाला शुद्ध पाणी मिळेल आणि आरओ वॉटर प्युरीफायरचे आयुष्य देखील चांगले राखले जाईल, हे बऱ्याच ग्राहकांच्या लक्षात येत नाही. या जागरूकतेच्या आभावापोटी ग्राहक स्थानिक आणि कमी पैशांत काम करून देणाऱ्या फिटर्सकडे वळतात, ज्यामधून कधीच अपेक्षित ते परिणाम घडून येत नाहीत. शिवाय स्थानिक सेवा पुरवठादार कित्येकदा बनावट आणि हलक्या दर्जाचे पर्यायी सुटे भाग बसविण्याचा सल्ला देतात, त्यामुळे खर्च कमी होतो; परंतु ती दुरुस्ती अल्पजीवी ठरते आणि दीर्घकालीन विचार करता ते प्रचंड महागात पडते, कारण अशा सुट्या भागांमुळे आरओ प्युरीफायरला पूर्णतः नुकसान पोचत असते.’

‘केंट आरओ’वर मिळणारी चार वर्षांची वॉरंटी ही या नमूद केलेल्या समस्येचे निराकरण करण्याच्या दिशेने उचललेले एक पाऊल आहे. एक वर्ष वॉरंटी आणि तीन वर्षांची मोफत सेवा पुरविणारी ‘केंट आरओ’ ही बाजारपेठेतील पहिलीच कंपनी आहे. यामुळे केवळ कमी पैशांत काम होते म्हणून स्थानिक सेवा पुरवठादारांकडून देखभाल वा दुरुस्ती करून घेऊन नये कारण बनावट सुट्या भागांमुळे यंत्र आणि शुद्ध होणारे पाणी दोन्हीची गुणवत्ता बिघडते, याबाबत आमच्या ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण होणार आहे.

‘चार वर्षे मोफत देखभाल सेवेमुळे आम्हाला ग्राहकांचा विश्वास जिंकणे देखील शक्य होणार आहे. उच्च दर्जाची देखभाल व दुरुस्ती सेवा, तसेच अस्सल सुटे भाग चार वर्षे निःशुल्क उपलब्ध होणार असल्याने ग्राहक स्थानिक आणि अविश्वासार्ह पर्यायांचा विचार करणार नाहीत. शिवाय आरओ प्युरीफायरचे आयुष्य वाढल्यामुळे ग्राहकांना १०० टक्के समाधान आणि मनःशांती देखील मिळणार आहे. ‘केंट आरओ’वर दिली जाणारी ही चार वर्षांची मोफत सेवा एक जागरूकता मोहीम म्हणून नावारूपाला येईल अशी आम्हाला खात्री आहे. आपल्या देखभाल गरजांसाठी स्थानिक सेवा पुरवठादारांपासून आमचे ग्राहक दूर राखण्यात आम्हाला या मोहिमेमुळे मोठे यश येईल,’ असे गुप्ता यांनी सांगितले.

‘केंट आरओ’विषयी :
पेटंटधारी मिनरल आरओ तंत्रज्ञानामुळे टीडीएस कंट्रोलरचा वापर करून केंट आरओ वॉटर प्युरीफायरमध्ये शुद्ध झालेल्या पाण्यातील अत्यावश्यक नैसर्गिक खनिजे कायम राखली जातात ज्यामुळे १०० टक्के सुरक्षित आणि चवदार पिण्याचे पाणी उपलब्ध होते. १०० टक्के शुद्ध पाण्यासाठी यामध्ये डबल प्युरीफिकेशन उपयोगात आणले जाते. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे विरघळलेले अशुद्ध घटक दूर केले जातात, अत्यावश्यक खनिजे कायम राखली जातात आणि पाण्याला १०० टक्के शुद्ध बनविण्यासाठी यामध्ये आरओ, युव्ही, युएफ आणि टीडीएस अशा विविध शुद्धीकरण तंत्रज्ञानांचा पुढाकाराने वापर केला जातो.

एवढेच नव्हे तर, ‘केंट आरओ’द्वारा शुद्ध झालेल्या पाण्याला एनएसएफ (युएसए) आणि डब्लूक्यूए (युएसए) यांच्यातर्फे सर्वोत्तम गुणवत्तेचे प्रमाणपत्र देखील मिळालेले आहे. त्याखेरीज, ‘केंट आरओ’च्या क्रांतिकारी सेव्ह वॉटर टेक्नोलॉजीचा उत्कृष्ट पाणी संधारण दर ५० टक्क्यांहून अधिक एवढा असून, निकृष्ट पाण्याचा दर ५० टक्क्यांहून कमी राखण्यात यश आलेले आहे. यामध्ये निकृष्ट पाणी वेगळ्या टाकीमध्ये साठवून ठेवण्यात येते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search