Next
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला बहारदार सुरुवात
BOI
Wednesday, December 12 | 06:44 PM
15 0 0
Share this story

सनईवादक कल्याण अपारपुणे : संगीत रसिक वर्षभर ज्याची आतुरतेने वाट पहात असतात, त्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला बुधवारी, १२ डिसेंबरपासून थाटात सुरुवात झाली. या वर्षी पहिल्यादांच मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या मैदानावर हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या ६६ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सुरुवात दुपारी साडेतीन वाजता औरंगाबादचे सनईवादक कल्याण अपार यांच्या सनई वादनाने झाली. 

त्यांनी राग गावती सादर करुऩ कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानतंर त्यांनी ‘माझे माहेर पंढरी’ हे भजन सादर करुन पहिल्या दिवसाची शोभा वाढविली. कल्याण अपार यांनी पंडित यशवंत क्षीरसागर यांच्याकडे आठ वर्षे तालीम करून सनई वादनात निपुणता मिळवली आहे.  

कोणत्याही शुभप्रसंगी सनईचे सूर वातावरणात प्रसन्नता निर्माण करतात. तोच अनुभव रसिकांना आला. सनईच्या सुरांनी सारे वातावरण भारले होते. रसिक मंत्रमुग्ध होऊन त्या सुरात न्हाऊन निघत होते. टाळ्यांच्या कडकडाटात रसिकांनी सनईच्या सुरांनी मोहिनी घालणाऱ्या या कलाकाराला दाद दिली. 

(सनई वादक कल्याण अपार यांच्या सादरीकरणाची झलक दाखवणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link