Next
डॉ. म्हैसेकर यांची माण तालुक्यातील चारा छावणीला भेट
प्रेस रिलीज
Thursday, May 09, 2019 | 03:13 PM
15 0 0
Share this article:

चारा छावण्यांचा संग्रहित फोटो

सातारा : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी माण तालुक्यातील मोगराळे, वडगांव येथील चारा छावणीला भेट देऊन फलटण येथील नगरपालिका टँकर फिडिंग पॉइंटची पाहणी केली. 

या वेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, फलटणचे प्रांताधिकारी संतोष जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्तांनी जनावरांना चारा, पाणी, पेंड व्यवस्थित मिळते का, याबाबत पशुपालक समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. या वेळी त्यांनी हालचाल रजिस्टर, छावणी भेट रजिस्टर, चारा वाटप रजिस्टर, चारा स्टॉक रजिस्टर, पेंड स्टॉक रजिस्टर, पशुपालक समिती रजिस्टर तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. चारा छावणीतील जनावरांचे टँगिंग करून, या जनावरांचे १०० टक्के लसीकरण करण्याच्या सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या. बिजवडी तालुका माण येथील सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीचीही त्यांनी पाहणी केली.

त्यानंतर डॉ. म्हैसेकर यांनी फलटण येथील नगरपालिका टँकर फिडिंग पॉइंटची पाहणी केली. या वेळी त्यांनी टँकर वाटप रजिस्टर, टँकर खेपा रजिस्टर, तसेच टँकरच्या (एमएच ०४ सीयू ९०२) ‘जीपीएस’चीही तपासणी केली. या टँकर फिडिंग पॉइंटच्या पाहणीनंतर फलटण तालुक्यातील नाईकबोंबवाडी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीची पाहणी केली.

दरम्यान, मोगराळे व वडगाव या चारा छावण्यांस आज भेट दिली. चारा छावणीतील जनावरांना शासनाच्या निकषानुसार चारा, पेंड व पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. चारा छावणीचे प्रस्ताव मंजुरीसाठी प्रलंबित असल्यास त्यावर तात्काळ निर्णय घेण्याच्या सूचना टंचाई आढावा बैठकीत डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.

दहिवडी येथील तहसील कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, उपायुक्त प्रतापराव जाधव, उपायुक्त निलीमा धायगुडे, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, माणचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, फलटणचे प्रांताधिकारी संतोष जाधव  यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

रोहयोंतर्गत सार्वजनिक कामांचे प्रस्ताव आल्यास त्याला तात्काळ मंजूरी द्या, अशा सूचना करत डॉ म्हैसेकर म्हणाले, ‘संबंधित तालुक्याचे तहसीलदार व गट विकास अधिकारी यांनी टँकरच्या खेपा शंभर टक्के होण्यावर भर देऊन टँकरचे मॉनिटरिंग जीपीएसच्या माध्यमातून मोबाइलद्वारे करावे. टँकरच्या खेपा लॉगबुकशीटशी पडताळून पाहावे. धरणातून सोडण्यात येणारा पाणीसाठा हा फक्त पिण्यासाठीच उपलब्ध करून देण्यात यावा, शेतीसाठी या पाण्याचा उपयोग होणार नाही, याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी; तसेच चारा छावण्यांबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. या सूचनांचे पालन चारा छावण्या तंतोतंत करतील यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत.’

जिल्हाधिकारी श्वेता सिंघल म्हणाल्या, ‘टंचाई भागातील पाणी उपसा १०० टक्के बंद झाला पाहिजे. यासाठी महसूल विभाग, इरिगेशन विभाग यांनी समन्वयाने काम करावे. ज्या ठिकाणी अवैध पाणी उपसा होत असेल त्या ठिकाणचे वीज कनेक्शन महावितरण कंपनीने तात्काळ काढून टाकावे.  प्रलंबित चारा छावणीचे प्रस्ताव दोन दिवसांत पाठवा.  टंचाई उपाय योजनेसाठी अधिकाऱ्यांनी आता फिल्डवर येऊन काम केले पाहीजे. टंचाई कामात लक्ष केंद्रित करून कामे गतीने करा.’ 

ग्रामपंचायतींमार्फत ‘नरेगा’ची कामे व टँकरच्या खेपांची टक्केवारी वाढविण्यावर योग्यरित्या काम केले जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी या बैठकीत सांगितले. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त यांनी माण तालुक्यातील ढाकणी तलावाची पाहणी केली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search